Mahayuti  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्रात बिहार पॅटर्न, एकनाथ शिंदेंना पुन्हा संधी, काय आहेत कारणं?

Who Is Maharashtra News CM: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार याबाबत सध्या महायुतीमध्ये जोरदार चर्चा आणि बैठका सुरू आहे. पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे अशी मागणी भाजपकडून केली जात आहे.

Priya More

वैदेही काणेकर, मुंबई

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने दणदणीत विजय मिळवला. या विजयात भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले. त्या पाठोपाठ शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेत. सर्वाधिक उमेदवार निवडून आल्यामुळे भाजपचे नेते त्यांचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा करत आहेत. यासाठी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती मिळत आहे.

मात्र ज्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला भरघोस यश मिळालं त्यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करून महाराष्ट्रात बिहारप्रमाणे मुख्यमंत्री पॅटर्न राबवण्याचं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं नियोजन असल्याचं वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे. पुन्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यामागची प्रमुख कारणे काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत...

१) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने विधानसभा निवडणूक लढवली आणि ऐतिहासिक २०० पेक्षा अधिक उमेदवार निवडून आणले.

२) महायुतीच्या गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात अनेक लोकप्रिय उपक्रम आणि योजनांची यशस्वी अंमलबजावणी मुख्यमंत्री एकनाथ शिॅदे यांनी करून दाखवली. त्याचाच परीणाम विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक झाला.

३) केंद्रात एनडीए मजबूत ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे भाजप मित्रपक्षांवर अन्याय करत नाही हा मेसेज देण्याचा प्रयत्न होऊ शकतो. एनडीएमध्ये शिवसेना चौथा सर्वात मोठा मित्र पक्ष आहे.

४) महाराष्ट्रात पुढील तीन महिन्यात सर्वच प्रलंबित महापालिकांच्या आणि नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीतही विजयी चेहरा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच लोकप्रियतेचा फायदा महायुतीला होणार आहे.

५) इतर राज्यातील मोठ्या विजयानंतरही भाजपच्या केंद्रातील सर्वोच्च नेतृत्वाने दूरदृष्टीने अनपेक्षित निर्णय घेऊन विजयी समिकरण कायम ठेवले होते.

६) त्यामुळे महायुती एकसंघ आणि भक्कम ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलू नये…. असं राजकिय समिकरण मजबूत होताना दिसत आहे.

७) भाजपचं एनडीएमधलं राजकारणही महत्वाचं आहे. गरज असेपर्यंत भाजप मित्रपक्षांना वापरतो. शिंदेंची गरज संपली, आता भाजपचा मुख्यमंत्री होणार’, ‘मित्रपक्षांना फसवण्याची भाजपची खोड’, ‘उद्धव ठाकरेंप्रमाणे शिंदेंना दगाफटका होणार, असा आरोप विरोधक (संजय राऊत ट्वीट ) करत आहेत. मात्र, भाजप शब्दावर ठाम असतो, हा संदेश महाराष्ट्रातही देण्यासाठी घवघवीत यशानंतरही बिहारप्रमाणे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देण्याबाबत भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांचा विचार सुरू आहे.

८) २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या वाटाघाटीत बंद दाराआड झालेल्या चर्चेत भाजप नेते अमित शहा यांनी आपल्याला मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता. निवडणुकीनंतर तो त्यांनी पाळला नाही, असा आरोप उद्धव ठाकरे आणि विरोधक गेले ५ वर्षे सातत्याने करत आहेत. मात्र, भाजप शब्द पाळतो आणि उद्धव ठाकरे खोटे बोलतात हे सिध्द करण्यासाठी भाजपचं नियोजन आहे.

९) राज्यात महायुती नेतृत्वाच्या विजयाचे श्रेय आणि मित्रपक्षांना समान संधी, सन्मान भाजप देतो, केंद्रात आणि राज्यात सोबत असलेल्या, साथ देणाऱ्या मित्र पक्षांना भाजपकडून तशीच वागणूक मिळते, हा संदेश जनतेत, विरोधकांना देणे भाजपसाठी आवश्यक झाले आहे. त्यामुळेच राज्यात मोठ्या बहुमतानंतरही बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही एकनाथ शिंदेंनाच पुन्हा मुख्यमंत्रिपद देण्याचा भाजप पक्षश्रेष्ठींचा कल असल्याचे समजते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 Live News: पंड्या RCB कडून खेळणार! लागली तब्बल इतक्या कोटींची बोली

Viral Video: जयगड बंदरावर माशांचा आला थवा, पाहा VIDEO

Narendra Modi : 'पराभूत होणाऱ्यांना संसदेत...'; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी PM मोदी विरोधकांवर कडाडले

Top 10 MLA: सर्वाधिक मताधिक्य मिळवलेले टॉप १० आमदार कोण?

Dheeraj Deshmukh News : .. अन् धीरज देशमुख यांच्या कार्यकर्त्यांना झाले अश्रु अनावर|VIDEO

SCROLL FOR NEXT