State Cabinet Expansion Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट, ७ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रिपदाचे चेहरे निश्चित?

Maharashtra Cabinet Expansion: ८ डिसेंबर रोजी विधानसभेच्या नव्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. भाजपकडून ८ डिसेंबरला दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज भरला जाणार आहे.

Priya More

Cabinet Expansion: राज्याला नवे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मिळाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा गुरूवारी पार पडला. त्यानंतर आता महायुतीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारांच्या हालचालींना वेग आला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्या राज्यातील महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे.

महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिन्ही वरिष्ठ नेत्यांची आज बैठक पार पडली. प्रफुल्ल पटेल यांच्या सीजे हाऊस येथील निवासस्थानी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यात १ तास बैठक झाली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बैठकीत चर्चा झाली असून या बैठकीत ७ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री पदाचे चेहरे निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

८ डिसेंबर रोजी विधानसभेच्या नव्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. भाजपकडून ८ डिसेंबरला दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज भरला जाणार आहे. ९ डिसेंबरला नव्या अध्यक्षाची निवड होणार आहे. राहुल नार्वेकर यांना पुन्हा संधी मिळणार की नवा अध्यक्ष होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्यापासून राज्याचे विशेष अधिवेशन सुरू होणार आहे. तर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदावर भाजपाचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते आज शपथ घेतील.

विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात निवडणून आलेले प्रतिनिधी आमदारकीची शपथ घेणार आहेत. विधानसभेचे एकूण २८८ प्रतिनिधी उद्या आमदारकीची शपथ घेणार आहेत. हंगामी अध्यक्षांनी आज शपथ घेतल्यानंतर विशेष अधिवेशनात आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तर दुसरीकडे मंत्रीपदाची आशा बाळगून असलेल्यांचा काहीसा हिरमोड झाला. भव्य शपथविधी सोहळा केवळ तिघांचा न ठेवता इतर मंत्र्यांचा सुद्धा होईल अशी काही नेत्यांना अपेक्षा होती. पण गुरूवारी फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. या शपथविधी सोहळ्यादरम्यान अखेरच्या क्षणापर्यंत काही नेत्यांना मंत्रिपद मिळण्याची आशा होती. किमान १० ते १२ मंत्र्यांचे शपथविधी होईल अशी अपेक्षा महायुतीच्या अनेक नेत्यांना होती. पण त्यांचा शपथविधी न झाल्यामुळे महायुतीमध्ये काहीशी नाराजी पाहायला मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

Shocking : लव्ह मॅरेजनंतर ४ महिन्यांनी जवानाच्या पत्नीने आयुष्य संपवलं; इन्स्टाग्रामवर पोस्ट केला शेवटचा व्हिडिओ

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT