sharad pawar and devendra fadnavis  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: साताऱ्यात मोठा राजकीय भूकंप? भाजपची मोठी खेळी; शरद पवारांना धक्का बसणार

Gayatridevi Pantpratinidhi joining BJP Satara: साताऱ्यातून मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. भाजपने साताऱ्यात मोठी खेळी करत राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला. औंध संस्थानाच्या राणी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी भाजपच्या वाटेवर आहेत.

Priya More

Summary -

  • साताऱ्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता

  • औंध संस्थानाच्या राणी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी भाजपमध्ये जाण्याची चर्चा

  • राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसणार

  • भाजपची साताऱ्यात ताकद वाढण्याची शक्यता

साताऱ्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपने साताऱ्यात मोठी खेळी केली आहे. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि औंध संस्थानाच्या राणी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी भाजपच्या वाटेवर आहेत. त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर साताऱ्यामध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसेल आणि साताऱ्यामध्ये भाजपची ताकद वाढेल.

मिळालेल्या माहितीनुसार, औंध संस्थानाच्या राणी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची साथ सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या या संभाव्य पक्षांतरामुळे सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी या कैलासवासी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्ती म्हणून ओळखल्या जात होत्या. भाजपमध्ये जाण्याबाबत त्यांनी अद्याप अधिकृत घोषणा केली नाही.

काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये गायत्रीदेवी यांनी राष्ट्रवादी पक्षाबरोबर राहत भाजपच्या विरोधात भूमिका घेतली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी या भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षासाठी मोठा धक्का राहिल.

गेल्या काही काळापासून स्थानिक पातळीवर आणि पक्षांतर्गत महत्त्वाच्या निर्णयांमध्ये गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांना विश्वासात घेतले जात नसल्याची चर्चा आहे. विकासकामांच्या मुद्द्यावरूनही त्या नाराज होत्या अशी देखील माहिती समोर आली आहे. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. भाजपमध्ये त्यांना सातारा जिल्ह्यात मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यानंतर आता संस्थांनिकांच्या वारशातील आणखी एक मोठे नाव भाजपसोबत आल्यास साताऱ्यामध्ये भाजपची पकड आणखी घट्ट होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उदयनराजे भोसले रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली प्रकृतीबाबत अपडेट| VIDEO

Smallest Railway station: देशातील सर्वात लहान रेल्वे स्टेशन कुठे आहे? तुम्ही गेलात का या ठिकाणी

Riyan Parag Vaping Fine : ड्रेसिंग रूममध्ये 'धूर' काढणाऱ्या रियान परागवर मोठी कारवाई

E sakal No.1 Marathi Site: ई सकाळ पुन्हा एकदा नंबर १; साडे सहा कोटी वाचकांनी दाखवला विश्वास

Budh Gochar: बुध करणार सूर्याच्या नक्षत्रात गोचर, एका रात्रीत या ३ राशींचं नशीब फळफळणार

SCROLL FOR NEXT