Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा उपाध्यक्ष पद मिळणार? कोणत्या नेत्याची होतेय चर्चा?

Maharashtra Politics: सामाजिक समतोल साधण्यासाठी एससी प्रवर्गाला न्याय देण्यासाठी उपाध्यक्षपद देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. आता विधानसभा उपाध्यक्ष पदाच्या नावाची चर्चा सुरू झालीय.

Bharat Jadhav

विधीमंडळ अधिवेशनाला सुरूवात झाली असून या अधिवशेनाच्या कालवधीत सभागृहाला उपाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. हा विधानसभा उपाध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. भाजपकडे विधानसभेचे अध्यक्षपद आणि विधानपरिषदेचे अध्यक्षपद आहे. आता विधानसभेच्या उपाध्यक्ष पदाची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजकुमार बडोले यांना उपाध्यक्ष पद दिलं जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सामाजिक समतोल साधण्यासाठी एससी प्रवर्गाला न्याय देण्यासाठी उपाध्यक्षपद देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्याचदरम्यान राजकुमार बडोले यांना उपाध्यक्षपद देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झालीय. तर दुसरीकडे विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर अजून शिक्कामोर्तब झालेलं नाहीये. या अधिवेशनात या पदावर निर्णय होण्याची शक्यता आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर दावा केल्याने महाविकास आघाडीतच वाद जुंपलाय.

काँग्रेस आणि ठाकरे गट आमनेसामने आलेत. दोन्ही पक्षांकडून विरोधी पक्ष नेते पदावर दावा केलाय. नाना पटोले यांनी काँग्रेसचाच विरोधीपक्ष नेता होईल, असे वक्तव्य केलंय. ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांचे नाव आघाडीवर आहे, तर काँग्रेसकडून सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. मविआचा विरोधीपक्ष नेता कोण होणार? याबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत. विरोधी पक्षनेतेपदासाठी इतर दोन पक्षांचा पाठिंबा लागणार आहे. ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे, सुनिल प्रभू यांच्या नावाचीही चर्चा होतेय.

अर्थसंकल्पाच्या पहिल्याच दिवशी विरोधक विविध मुद्द्यांवरून आक्रमक झालेत. सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. बऱ्याचदा अधिवेशनाच्या दिवशी विरोधक सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेताना दिसतात. पहिल्या दिवशी विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आंदोलनास बसत असतात. परंतु आज पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड विधान भवनात बेड्या घालून पोहचले.

विधान भवनात जितेंद्र आव्हाड दाखल होताच सर्व माध्यमांच्या कॅमेऱ्यांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेलेत.त्यावेळी माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जो घाला घातला जातोय. जे कार्यकर्ते व्यक्त होतायेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून आवाज बंद केले जात आहेत. ही पद्धत चुकीची आहे. आम्हाला संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलाय. हे मुलभूत अधिकार असताना ते शाबीत राहिले पाहिजेत, त्यासाठी बेड्या घालून निषेध केला जात आहे असं आव्हाड म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात ड्रग्जचा मोठा कारखाना सुरू करण्याचा कट उधळला; सव्वा कोटींच्या मुद्देमालासह ८ जणांना अटक

Jalna Tourism : इतिहासातील महत्त्वाचे पान! प्राचीन लेण्यांनी सजलेला जालनामधील 'हा' किल्ला, उन्हाळी सुट्टीत करा भटकंती

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Riteish - Raja Shivaji Collection : रितेश देशमुख मालामाल; दुसऱ्या रविवारी 'राजा शिवाजी' ने बनवला 'हा' मोठा रेकॉर्ड, एकूण कमाई किती?

Dhokla Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा स्पाँजी आणि चविष्ट ढोकळा चटणी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT