Ajit Pawar saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: कोल्हापुरात अजित पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली साथ; भाजपच्या वाटेवर

Political Earthquake in Kolhapur: कोल्हापुरमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडली. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आगामी निवडणुकीपूर्वी कोल्हापुरात भाजपची ताकद वाढली आहे.

Priya More

Summary -

  • कोल्हापूरमध्ये अजित पवार गटातील मोठे नेते प्रवीणसिंह पाटील यांनी पक्षाची साथ सोडली.

  • ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

  • त्यांच्या पक्षप्रवेशामुळे कागल तालुक्यात भाजपची ताकद वाढणार आहे.

  • हसन मुश्रीफ यांना हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. भाजपने अजित पवार गटाच्या बड्या नेत्याला फोडलं. प्रवीणसिंह पाटील यांनी अजित पवार गटाला रामराम ठोकला. ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाठी देखील मोठा धक्का मानला जात आहे.

प्रवीणसिंह पाटील हे शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष आहेत. ते हसन मुश्रीफ यांच्या जवळचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत. गेल्या ५० वर्षांपासून मुरगुड नगरपालिकेवर त्यांच्या गटाची सत्ता आहे. प्रवीणसिंह पाटील यांना मागच्या वर्षी शेतकरी संघाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. त्यांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे कोल्हापुरमध्ये अजित पवार गटाला खिंडार पडण्याची शक्यता मानली जात आहे.

राजे खान जमादार यांचा माजी खासदार संजय मंडलिक यांच्याशी वाद झाला होता. त्यामुळे राजे खान जमादार यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी जवळीक वाढवली होती. यामुळेच प्रवीणसिंह पाटील हे नाराज होते. गेल्या काही दिवसांपासून ते राजकीय भूमिकेत अस्वस्थ होते. कोणत्याही परिस्थितीत तडजोड न करण्याची भूमिका त्यांनी घेतली. अखेर प्रवीण सिंह पाटील यांनी अजित पवार गटाची साथ सोडत भाजपमध्येच जाण्याचा निर्णय घेतला.

प्रवीणसिंह पाटील यांच्या प्रवेशामुळे कोल्हापूरातील कागल तालुक्याच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे कागलमध्ये भाजपची ताकद आणखी वाढेल. त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे प्रवीणसिंह पाटील यांचे मोठे भाऊ गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. दोन्ही भावांमध्ये मतभेत आहेत. अशामध्ये आता प्रवीणसिंह पाटील यांनी कार्यकर्त्यांचा मेळाव घेत भाजपमध्ये जाणार असल्याचे जाहीर केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nilesh Ghaywal illegal property : घायवळच्या घरावर पोलिसांची धाड, कोण आहे घायवळचा आका? VIDEO

'आनंदाचा शिधा' बंद होणार? लाडकी बहिण योजनेचा फटका

Two Group Clash : भाजप मंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान मोठा राडा; कार्यकर्ते आपापसात भिडले, नेमकं काय घडलं? VIDEO

Maharshtra Politics: मनसे की ठाकरेसेना, मुंबईत महापौर कोणाचा? ठाकरेंचा पाच महापालिकांचा फॉर्म्युला ठरला?

Accident : इटलीमध्ये भीषण अपघात! ट्रक आणि कारची जोरदार धडक, ४ भारतीयांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT