Uddhav Thackeray And Eknath Shinde Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Maharashtra Politics: कोकणात ठाकरेसेनेला मोठं खिंडार, बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सोडली साथ; 'धनुष्यबाण' घेणार हाती

Big Blow to Uddhav Thackeray in Konkan: उद्धव ठाकरे यांना रत्नागिरीत मोठा धक्का बसला आहे. बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडली असून ते आज शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदेगटात प्रवेश करणार आहेत.

Priya More

Summary -

  • कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का

  • उमेश खताते यांनी पक्ष सोडला

  • शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

  • रत्नागिरीतील राजकारणात खळबळ

अमोल कलये, रत्नागिरी

कोकणातून एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. कोकणामध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. शिवसेना ठाकरे गटाच्या बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षाची साथ सोडली. युवासेनेचे आक्रमक नेते उमेश खताते यांनी पक्षाला रामराम ठोकला. ते आज मुंबईत शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदेगटात प्रवेश करणार आहेत. रत्नागिरीत ठाकरेसेनेला खिंडार पडल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून युवासेनेचे माजी तालुकाप्रमुख आणि सक्रिय नेते उमेश खताते यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे खेर्डी परिसारत राजकीय खळबळ उडाली. ​उद्धव ठाकरेंची साथ सोडत उमेश खताते हे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईमध्ये जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत. उमेश खताते यांच्यासह शेकडो कार्यकर्ते धनुष्यबाण हाती घेणार आहेत.

उमेश खताते हे केवळ राजकारणातच नव्हे, तर समाजकारणातही अत्यंत सक्रिय आहेत. त्यांनी आजवर अनेक स्थानिक प्रश्न आक्रमकपणे मांडून सामान्य नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे. विशेषतः खेर्डी परिसरातील पक्ष संघटना मजबूत करण्यात त्यांचा मोठा वाटा मानला जातो. उमेश खताते यांच्या या निर्णयामुळे रत्नागिरीच्या स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे रत्नागिरीत शिंदेसेनेची ताकद वाढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आणखी एका दिग्गज नेत्याची एक्झिट! भाजप आमदार,माजी मंत्र्यांचे निधन! राज्याच्या राजकारणात शोककळा

Drinking Milk At Night: रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याने शरीरात काय होतं?

Gold Earrings For Married Woman: महिलांसाठी सोन्याचे कानातले; ‘या’ 5 ट्रेंडी डिझाईन्स पाहा

Maharashtra News Live Update: धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

Detox Water Benefits: वजन कमी करण्यासोबत पचनही सुधारायचं? आठवड्यातून ३ वेळा प्या हे टेस्टी डिटॉक्स वॉटर

SCROLL FOR NEXT