जळगावमध्ये ठाकरे गटाला भाजपकडून मोठा धक्का बसला आहे.
ठाकरे गटातील १५ शिलेदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
यापैकी ७ जणांना भाजपकडून निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित केली आहे.
जळगाव मनपा निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद चांगलीच वाढली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांमध्ये इनकमिंक आणि आऊटगोईंग सुरू आहे. अशामध्ये जळगावमध्ये भाजपने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. ठाकरेंच्या १५ शिलेदारांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. हे सर्व जण भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.
या सर्वांचा पक्षप्रवेश होणार होता पण पुरामुळे प्रवेशाचा मुहूर्त तूर्तास टळला आहे. जळगाव महापालिका निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. ठाकरे गटातून प्रवेश करणाऱ्यांपैकी ७ जणांना भाजपकडून आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात येणार आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटातून भाजपत जाणाऱ्या १५ जणांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त घटस्थापनेच्या दिवशी ठरला होता. पण जळगाव जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे मुहूर्त लांबला आहे. या सर्वाचा पक्षप्रवेश नवरात्रीच्या कालखंडात होणार हे निश्चित झाले आहे. दरम्यान प्रवेश करणाऱ्या ७ जणांची उमेदवारी भाजपकडून निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये ३ माजी महापौरांचा समावेश आहे.
जळगाव मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने एकहाती सत्ता मिळवण्यासाठी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम सुरू केला आहे. जिल्हाभरात इतर पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते गळाला लावण्याचे काम सुरू आहे. जळगाव शहरातील शिवसेनेच्या ठाकरे गटातील मातब्बरांना भाजपत प्रवेश दिला जाणार आहे. जिल्ह्यामध्ये भाजपकडून ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक धक्के दिले जात आहे. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद चांगलीच वाढत चालली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.