Maharashtra Politics:  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मोठी बातमी! शिंदेंच्या जवळच्या मंत्र्याला झटका, महत्वाच्या अधिकाराला कात्री; राजकीय वर्तुळात खळबळ

Education Minister Dada Bhuse: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे मंत्री दादा भुसे यांना मोठा धक्का बसला. दादा भुसे यांच्या महत्वाच्या अधिकाराला कात्री लावण्यात आली आहे.

Priya More
  • शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना मोठा धक्का

  • दादा भुसेंच्या शालेय शिक्षण विभागातील अधिकारांना कात्री

  • दादा भुसेंचे महत्त्वाचे अधिकार सचिव आणि शिक्षण आयुक्तांकडे

  • दादा भुसे यांनी अधिकार कमी करण्याच्या निर्णयावर दिली प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जवळच्या मंत्र्याला मोठा धक्का बसला आहे. शिंदेसेनेकडे असलेल्या शालेय शिक्षण खात्याचे महत्त्वाचे अधिकार कमी करण्यात आले आहेत. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडील महत्वाच्या अधिकारांना कात्री लावून ते थेट विभागाचे सचिव आणि शिक्षण आयुक्तांकडे सोपवण्यात आले आहेत. शिक्षण खात्याचे अधिकार कमी करण्यावर मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया देत हा निर्णय मी स्वतःच घेतला असल्याचे सांगितले.

स्वयंम अर्थसहाय्य शाळांच्या अतिरिक्त तुकड्या, शाखांना मान्यता देणं आणि विविध मंडळांना ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे अधिकार आता बदलण्यात आले आहेत. हे अधिकार आता सचिव आणि शिक्षण आयुक्तांकडे सोपवण्यात आले आहेत. प्रशासकीय कारभारात सुधारणा आणि गतिमानता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आधी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या मराठी सक्तीच्या निर्णयाबत फेरबदल आणि आता भुसेंचे अधिकार कमी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

राज्य सरकारच्या प्रशासकीय कारभारात सुधारणा आणि गतिमानता आणण्याकरिता शालेय शिक्षण खात्याशी संबंधित मंत्र्यांच्या महत्त्वाच्या अधिकारांना कात्री लावण्यात आल्याच्या बातमीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यावर आता शालेय मंत्री दादा भुसे यांनीच प्रतिक्रिया दिली. 'कामांची गर्दी होऊ नये, कामात सुटसुटीत पणा यावा म्हणून मी स्वतः हा निर्णय निर्णय घेतला,'अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली.

स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये अतिरिक्त तुकड्यांना, शाखांना मान्यता देण्याचे, सीबीएसई, आयसीएसई सारख्या विविध मंडळांच्या अभ्यासक्रमांना ना-हरकत प्रमाणपत्र देण्याचे तसेच नव्या तुकड्या व शाखांना मान्यता देण्यासारखे महत्त्वाचे अधिकार विभागाचे सचिव आणि शिक्षण आयुक्तांकडे सोपविण्यात आल्याचा निर्णय मी स्वतः घेतला आहे, असे दादा भुसे यांनी स्पष्टपणे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Refrigerator electricity consumption: फ्रीजचा दरवाजा वारंवार उघडल्याने वीजबिल वाढतं का?

Maharashtra News Live Update: अल्पसंख्यांक संस्थांना पवित्र पोर्टल द्वारे नियुक्त करणे बंधनकारक नाही, हायकोर्टाचा निर्णय

कोकणात राजकीय राडा! ठाकरेंच्या बड्या नेत्याला राहत्या घरातून अटक; आमदार राणेंवर केलेली आक्षेपार्ह टिप्पणी

माहूर घाटात टेम्पो दरीत कोसळला, ३ भाविकांचा मृत्यू, ५ गंभीर; रेणुका मातेचे दर्शन घेऊन येताना काळाचा घाला

Brown Egg Vs White Egg: तपकिरी की सफेद, कोणती अंडी आरोग्यासाठी सर्वात पौष्टिक?

SCROLL FOR NEXT