Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठं खिंडार! नेते, पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते ठाकरेसेनेत करणार प्रवेश

Maharashtra Political News : आगामी निवडणुकीच्या आधी काँग्रेस पक्षाला अहिल्यानगरमध्ये मोठा धक्का बसला आहे. अहिल्यानगर शहर काँग्रेसमधील अनेक प्रमुख पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

Yash Shirke

  • काँग्रेस पक्षाला अहिल्यानगरमध्ये खिंडार

  • अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा

  • शिवसेना ठाकरे गटामध्ये करणार प्रवेश

Ahilyanagar : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जानेवारी २०२६ मध्ये होणार आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोंडीना वेग आल्याचे पाहायला मिळत आहेत. विविध पक्षांमध्ये इनकमिंग आणि आउटगोईंग सुरु आहे. अहिल्यानगरमध्ये आगामी निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसल्याची चर्चा रंगली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते, पदाधिकारी यांनी पदांचे सामूहिक राजीनामे दिले आहेत. यामध्ये अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, काँग्रेस ग्रंथालय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुनील लांडगे, ब्लॉक काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष मनोज गुंदेचा आणि महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष उषा भगत आणि शहर जिल्हा उपाध्यक्ष शैला लांडे असा काही पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

सामूहिक राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. अहिल्यानगरचे ठाकरे गटाचे शहरप्रमुख किरण काळे यांच्या पुढाकारातून पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी किरण काळे हे काँग्रेसमधून बाहेर पडून ठाकरेसेनेमध्ये गेले होते. त्यानंतर काँग्रेसमध्ये रिक्त झालेल्या शहर जिल्हाध्यक्ष पदावर दीप चव्हाण यांची वर्णी लागली.

मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगरमध्ये काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या पदाधिकाऱ्यांचा आज शनिवारी (२० सप्टेंबर) संध्याकाळी पाचच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरेसेनेमध्ये प्रवेश होणार आहे. पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसचे शेकडो कार्यकर्तेही मशाल हाती घेणार आहेत. या पक्षप्रवेशाला उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा दणका! दोन बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी हाती घेतलं कमळ; महायुतीत खळबळ

Sunday Horoscope: रविवारपासून बदलणार या 5 राशींचे नशीब! पैशांचा पाऊस, करिअरमध्ये मोठी झेप; वाचा संपूर्ण राशीभविष्य

Ind vs SL : टीम इंडियाला जोरदार झटका; स्टार फलंदाज वेदनेनं विव्हळत मैदानाबाहेर गेला, चिंता वाढवणारा तो फोटो होतोय व्हायरल

India : पाण्यावर तरंगतंय संपूर्ण गाव! निसर्गाचा हा अद्भूत चमत्कार पाहून व्हाल थक्क

Death News: २६वा वाढदिवस साजरा करण्याआधीच काळाचा घाला; प्रसिद्ध मॉडेल-इन्फ्लुएन्सरचं दुर्दैवी निधन

SCROLL FOR NEXT