Parimal Bhosale joins Eknath Shinde-led Shiv Sena in the presence of MLA Nilesh Rane at Radha Tai Lad Hall in Chiplun. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा भाजपला दे धक्का! बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश,कोकणातील राजकारण तापलं

Chiplun Politics: चिपळूणमधील एक बड्या भाजप नेत्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपने केलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईनंतर त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय. कोकणच्या राजकारणात हा एक मोठा धक्का मानला जातोय.

Bharat Jadhav

  • भाजपच्या बड्या नेत्याने शिंदे गटात प्रवेश करून पक्षाला धक्का दिला.

  • पालिका निवडणुकीपूर्वी भाजपने काही पदाधिकाऱ्यांवर हकालपट्टी केली होती.

  • प्रवेश सोहळा आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडला.

चिपळूणमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला असून हा धक्का दिलाय मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने. चिपळूणमधील भाजपच्या बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडत शिंदे गट शिवसेनेत प्रवेश केलाय. चिपळून पालिकेच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी भाजपने चार पदाधिकाऱ्यांवर हकालपट्टीची कारवाई केली होती. यात माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडेंसह भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष परिमल भोसले यांचा समावेश होता.

आता परिमल भोसले यांनी भाजपला जोरदार धक्का देत थेट शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. चिपळूण शहरातील राधाताई लाड सभागृहात कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत भोसले यांनी प्रवेश केला. परिमल भोसले यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे.

चिपळूण शहराच्या पहिल्या नगराध्यक्ष म्हणून सुरेखा खेराडे यांनी (२०१७) काम केलं होतं. परिमल भोसले यांना भाजपकडून स्वीकृत सदस्य म्हणून पालिकेत काम करण्याची संधी मिळाली होती. परिमल भोसले यांच्या या पक्ष प्रवेशामुळे चिपळूणमधील राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. आगामी काळात शिवसेनेची ताकद लक्षणीय वाढण्याचे संकेत मिळत आहेत.

चिपळूण पालिकेची दोन महिन्यापूर्वी निवडणूक झाली होती. त्यावेळी परिमल भोसले यांनी पक्षाचा आदेश धुडकावून अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांच्यासह सुधीर पानकर, सुरेखा खेराडे आणि श्रीराम शिंदे यांचे पक्षाने निलंबन केले होतं. पक्षाच्या विरोधात काम केल्यामुळे त्यांची हाकालपट्टी करण्यात आली होती. ही कारवाई प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्फत झाली होती.

हकालपट्टी कारवाई परिमल भोसले यांनी भाजपवर टीका केली होती. दरम्यान पालिकेच्या निवडणूकीत मला उमेदवारी देण्यात आली नाही, तेव्हा मी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला होता. यामुळे पक्षातून निलंबित करण्याचा प्रश्न येत नसल्याचं म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगड जिल्ह्यात वादळी पावसाने घेतला एक बळी

Konkan Tourism : कोकणात मामाच्या गावाला गेलाय? मग 'हा' स्वर्गाहून सुंदर समुद्रकिनारा एकदा पाहाच

भीषण अपघाताने संसार उद्ध्वस्त; बस-दुचाकीच्या धडकेत नवरा-बायकोचा जागीच मृत्यू

Crime News: बायकोचे दिव्यांग व्यक्तीसोबत संबंध, नवऱ्याने त्याला शेतात नेऊन दारू पाजली आणि...! 37 दिवसांनी उघड झालं चक्रावणारं सत्य

भारतीय रेल्वेचा नवा वेगवान चमत्कार! वंदे भारतने गाठला 180 kmph वेग; प्रवाशांचा किती वेळ वाचणार?

SCROLL FOR NEXT