महाराष्ट्रात राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्चला निवडणूक होणार
महायुतीला ६ जागा निश्चित असून सातव्या जागेवरही उमेदवार देण्याची शक्यता
भाजपकडून अनेक दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत
राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांचे नाव जवळपास निश्चित
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. आमदारांच्या संख्याबळानुसार महायुतीला ६ आणि महाविकास आघाडीला १ जागा मिळणार आहे. राज्यसभेची खासदारकी मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. महायुतीच्या सहा जागांपैकी ४ जागा भाजपला तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदेगटाला प्रत्येकी एक जागा मिळणार आहे. भाजपकडून केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंसह अनेक नेत्यांची नाव चर्चेत आहेत. तर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला आणि शिंदेसेनेकडून बैठका सुरू आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. सातव्या जागेवर देखील महायुती उमेदवार देण्याची शक्यता आहे.
महायुतीकडून सहाही जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी बैठका सुरू आहेत. त्यांनी उमेदवारांची नावं जवळपास निश्चित देखील केली आहे. पण महाविकास आघाडीमध्ये राज्यसभेच्या जागांवरून वाद सुरू आहे. तिन्ही पक्षांनी या एका जागेची मागणी केली आहे. मविआमध्ये उमेदवारांवरून वाद सुरू आहे. हा वाद पाहता पहिल्या टप्प्यामध्ये विजयाची खात्री असणारी महायुती सातव्या जागेवर देखील आपला उमेदवार देण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील ७ जागांसाठी येत्या १६ मार्चला निवडणूक होणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार रिक्त होणाऱ्या ७ जागांपैकी भाजपला ४ जागा, शिवसेना शिंदे गटाला १ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला १ जागा येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. भाजपकडून देखील काही दिग्गज नेत्यांची नाव चर्चेत आहेत. तर एकनाथ शिंदेंनी देखील एका उमेदवाराच्या निवडीसाठी महत्वाची बैठक बोलावली होती.
भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये राज्यसभेमध्ये कुणाला पाठवायचे याबाबत अनेक नेत्यांच्या नावांवर चर्चा झाली होती. राज्यसभेसाठी विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील आणि भागवत कराड यांच्यासह काही नेत्यांच्या नावांची चर्चा होत आहे. आता यामधील कुणाला भाजपकडून संधी दिली जाते हे पाहणं महत्वाचे राहिल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.