ठाकरे गटातील नाराज आमदार भास्कर जाधवांनी आता अप्रत्यक्षपणे राऊतांविरोधात स्टेटस वॉर छेडलंय. मात्र जाधवांचं स्टेटस काय आणि त्यांच्या मातोश्री वारीत नेमकं काय घडलं? यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट...
दीपक को घी तब चाहिए, जब वो जल रहा हो..बुझने के बाद... घी डालना व्यर्थ है... असं स्टेटस ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधवांनी व्हॉट्सऍपवर ठेवलं आणि राजकीय वर्तुळात या स्टेट्सची चांगलीच चर्चा रंगली. पक्षात वारंवार डावललं जात असल्यानं ते नाराज आहेत आणि ही नाराजी त्यांनी संधी मिळेल तेव्हा व्यक्त केली आहे. मात्र यावेळी भास्कर जाधवांनी ठेवलेल्या व्हॉट्सअॅप स्टेटसची संजय राऊतांनीच दखल घेतली.
राऊतांच्या विधानानंतर जाधवांनी पुन्हा आपलं व्हॉट्सअप स्टेटस बदललं. बिना शिकायत और बिना निंदा किये एक दिन बिता कर तो देखिये...खुशी, शांति और सकुन कहीं ढूंढनी नहीं पड़ेगी, अपने आप मिल जाएगी. असं म्हणत जाधवांनी स्टेट्समधून राऊतांना घरचा आहेर दिला. दरम्यान भास्कर जाधवांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतलीय. या भेटीमागे नेमकं काय कारण होतं? याबद्दलही जाधवांनी भाष्य केलयं.
मुळात गेल्या काही दिवसांपासून भास्कर जाधवांचं सुरु असलेलं नाराजी नाट्य काही संपलेलं दिसत नाही.त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नाराज भास्कर जाधव निवृत्तीचा मार्ग स्वीकारतात की ठाकरेंची साथ सोडून सत्तेच्या आश्रयाला जातात? यावर कोकणातील सत्तेची गणित अवलंबून असणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.