Pankaja Munde
Pankaja Munde Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : पाणी देणारा नेता हवाय की बाटली देणारा; पंकजा मुंडेंचा रोख कुणाकडे?

विनोद जिरे

Pankaja Munde Marathi News : घराघरात पाणी देणारा नेता पाहिजे की घराघरात चपटी बॉटल देणारा नेता पाहिजे ? असं म्हणत पंकजा मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय. तसेच केंद्र सरकारची योजना आणि राज्यात सरकार आमचं तरी दुसरेच आमच्या योजनेच उद्घाटन करण्यास पुढे येतात असं म्हणत विकासाच्या मुद्द्यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली. (Latest Marathi News)

बीडच्या (Beed) परळी येथील कौठळी गावात जल जीवन मिशन योजनेच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, की यांनी परळी शहरातील भुयारी गटार योजनेच्या नावाखाली चांगले रस्ते फोडले आणि म्हणे विकास केला अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे.

तुम्हाला नेमका कसा नेता पाहिजे? तर तुम्हाला भूषण वाटावे अशा नेतृत्वाची गरज आहे. पुढची पिढी घडवणारा नेता पाहिजे की, पुढची पिढी वाया घालवणार नेता पाहिजे. घरा घरात पाणी देणारा नेता पाहिजे ? की घरा घरात चपटीची बॉटल देणारा नेता पाहिजे? असं म्हणत पंकजा मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर निशाणा साधला.  (Maharashtra Political News)

मुंडे साहेबांच्या नंतर तुम्ही सगळे कोणाचं नाव घेता माझं. कारण तुम्हाला कुशल अन चांगला नेता तुम्हाला पाहिजे. मी निवडणुकीमध्ये हरले तेव्हा पासून तुमच्या मोबाईलवर मॅसेज येण बंद झाले. पैसे वाटणारा, तमाशा दाखवणारा, मत विकत घेणारा भ्रष्टाचार करणारा, खोटे गुन्हे दाखल करणारा, चारित्र्यहिन राजकारणातील विलन असतो. असं म्हणत पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा आक्रमक निशाणा साधला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boycott Election : मेणबत्ती पेटवत मतदान न करण्याची घेतली शपथ; कळमदरी ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

Solapur Breaking: भाजप उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

Technology Tips: एसीची कूलिंग घरबसल्या वाढवायची आहे? फॉलो करा 'या' सोप्या ट्रिक्स

Raigad News: अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला प्रकरण, भरत गोगावलेंच्या मुलासह २५ ते ३० जणांविरोधात गुन्हा

Life Success Tips : शहाणे असाल तर आयुष्यातील 'या' गोष्टी कधीच कुणालाही सांगू नका, अन्यथा पश्चाताप होईल

SCROLL FOR NEXT