Actress Sandel: ठाण्यात प्रसिद्ध अभिनेत्रीकडून देहविक्रीचा व्यवसाय; ग्राहकांना गुपचूप पाठवायची फोटो, असा झाला भंडाफोड?

Actress Sandel: ठाण्यात वेब सिरीज अभिनेत्रीच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या देहविक्री रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. व्हॉट्सअॅपवर ग्राहकांना फोटो पाठवले जात होते. या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली.
thane police bust human trafficking racket run by famous web series actress rescued 2 women
thane police bust human trafficking racket run by famous web series actress rescued 2 womenSaam Tv
Published On

Actress Sandel: झटपट श्रीमंत होण्याच्या नादात हल्ली अनेक तरुण- तरुणी चुकीचे पाऊल उचलतात. असाच एक प्रकार ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात घडला आहे. या परिसरातील एका हॉटेल आज पोलीसांनी हाय-प्रोफाइल देहविक्री रॅकेटच्या शोधात धाड टाकली. पण यावेळी एक वेब सिरीजमध्ये काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री पकड्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिच्यासोबत दोन पिडित महिलांची सुटका केली आहे.  

पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार,  22 फेब्रुवारी रोजी हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं.   २६ वर्षीय ही तरुणी काही काळापासून हिंदी वेब सिरीजमध्ये छोट्या भूमिका करत होती, पण सतत काम नसल्यामुळे तिने देहविक्री व्यवसायात मध्यस्थी म्हणून काम करत होती. भूमिका स्वीकारली होती. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तिने व्हॉट्सअ‍ॅपवर महिलांचे फोटो पाठवले आणि त्यातून पैसे मिळवण्याचा रॅकेट चालवला, असा संशय उघड झाला आहे.

thane police bust human trafficking racket run by famous web series actress rescued 2 women
Govinda: गोविंदाला सुनितासोबत लग्नच करायचे नव्हते; 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता वेडा, साखरपुडाही मोडलेला, पण...

पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर बनावट ग्राहक तयार करून सापळा रचला. ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरातील एका हॉटेलमध्ये आल्यावर पोलिसांनी छापा टाकला. त्यानुसार आरोपी महिलेला ताब्यात घेऊन दोन पिडितांची सुटका केली आहे. तपास अधिकारी म्हणाले की, या रॅकेटद्वारे महिलांना ‘ग्लॅमर’च्या नावाखाली जाळ्यात ओढून अनैतिक व्यवसायात सहभागी घेण्यात भाग पाडायची. आरोपी व्हॉट्सअॅपवर  ग्राहकांशी संपर्क साधायची आणि टीव्ही कलाकार देखील भेटतील असे सांगून २५,००० रुपयांची मागणी करायची.

thane police bust human trafficking racket run by famous web series actress rescued 2 women
Aditya Pancholi: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्यावरील बलात्काराचा गुन्हा रद्द होणार? २ आठवड्यांनी कोर्टात होणार सुनावणी

या कारवाईत पोलिसांनी बरेच पुरावे सापडले असून, आरोपींच्या मोबाइलमधून ग्राहकांना पाठवलेले मॅसेज आणि फोटो सापडले आहेत. आरोपीविरोधात मानवी तस्करी आणि अवैध देहविक्रीसाठी गुन्हा नोंदवला आहे. तसेच ११,६१०11 रुपयांच्या वस्तू जप्त केल्या असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com