Faridabad Accident : वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले ते परतलेच नाही; भीषण अपघातात 6 तरुणांचा जागीच मृत्यू, कार चक्काचूर

Faridabad Road Accident : हा अपघात इतका इतकी भीषण होता की धडकेत कारचा चक्काचूर झाला.
Faridabad Road Accident
Faridabad Road Accident Saam Tv

Faridabad Road Accident Marathi News : हरियाणातील फरिदाबाद येथे गुरुवारी (२ फेब्रुवारी) रात्री उशिरा एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. या भीषण अपघातात सहा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की कोणालाही गाडीतून बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. मृत्युमुखी पडलेले सर्व तरुण हे पलवल येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

Faridabad Road Accident
Sandeep Deshpande News : संदीप देशपांडे हल्ला प्रकरण; दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात, मास्टरमाईंड कोण?

या अपघाताची (Accident) माहिती मिळताच पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी फरिदाबाद जिल्हा रुग्णालयात (Hospital) पाठवले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पुनीत, जतिन, आकाश, संदीप, बलजीत आणि विशाल हे कारमध्ये बसून आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गुडगावला गेले होते.

वाढदिवस साजरा करून सर्वजण रात्री उशिरा परतत होते. त्यावेळी अचानक गुरुग्राम - फरीदाबाद रस्त्यावरील पाली गावाजवळ पोहोचल्यावर त्यांची कार एका डंपरला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की या धडकेत सहा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. (Accident News)

Faridabad Road Accident
Crime News : प्राध्यापिकेची विद्यार्थ्याला लाथा- बुक्यांनी मारहाण, पालकाची शिवाजीनगर पाेलिसांत धाव

तर समोरासमोर झालेल्या धडकेत कारचे चक्काचूर झाले. धडकेनंतर कारचे तुकडे सर्वत्र उडून विखरल्या गेले. सर्व मृतांचे वय 24 ते 30 वर्षांच्या दरम्यान आहे. या प्रकरणी पोलीस सध्या कायदेशीर कारवाई करत आहेत. दरम्यान या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com