Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: टेंडर आणि पार्टनरशिपची ऑफर, खासदार बजरंग सोनवणेंच्या मित्रावर गुन्हा

Bajarang Sonawane: बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेंडर आणि पार्टनरशिपची ऑफर देऊन फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्यात.

Priya More

Summary -

  • बीड खासदार बजरंग सोनवणे यांच्या मित्रावर १३.५ लाख फसवणुकीचा गुन्हा.

  • धनंजय धसे आणि त्यांचा मुलगा देवाशीष धसे यांच्यावर गुन्हा दाखल.

  • २०१६ मध्ये टेंडर व पार्टनरशिपच्या नावाखाली पैसे घेतल्याचा आरोप.

  • या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ.

योगेश काशिद, बीड

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मित्रावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेंडर देतो म्हणून १३.५ लाख रुपयांची रक्कम घेऊन फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी बीडच्या चकलंबा पोलिस ठाण्यात धनंजय धसे आणि त्यांचा मुलगा देवाशीष धसे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदारांचे सहाय्यकावर गुन्हा दाखल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अनेक आमदार-खासदारांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहणारे धनंजय धसे आणि त्यांचा मुलगा देवाशीष धसे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चकलंबा पोलिस ठाण्यात धनंजय धसे आणि त्यांचा मुलगा देवाशीष यांच्याविरोधात तब्बल १३.५ लाख रुपयांच्या फसवणुकीचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय धसे हे सध्या बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे जवळचे मित्र म्हणून दिल्ली येथे काम पाहत असल्याची माहिती पुढे आली आहे.

फिर्यादी भरत नवनाथ खेडकर यांनी चकलंबा येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, २०१६ मध्ये धनंजय धसे आणि त्यांचा मुलगा देवाशीष धसे यांनी नवनाथ खेडकर यांच्याशी संपर्क साधून 'तुम्हाला शेत तलावाच्या दुरुस्तीचे टेंडर मिळवून देतो आणि आपण पार्टनरशिपमध्ये हे काम करू, अशी ऑफर दिली. आणि या ऑफरच्या लालसेपोटी सर्व प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येत आहे. धसे त्यावर विश्वास ठेवून खेडकर यांनी त्यांच्याकडे एकूण १३.५ लाख रुपयांची रक्कम दिलीअसल्याचे फिर्यादीत सांगण्यात आले आहे.

२०१६ पासून आजतागायत ना टेंडर मिळाले, ना पैसे परत करण्यात आले. वारंवार पाठपुरावा करूनही देखील प्रतिसाद न मिळाल्याने अखेर खेडकर यांनी चकलांबा पोलिस ठाण्यात धसे पितापुत्रांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून चकलांबा पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे आणि या दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यासंदर्भात खासदार बजरंग सोनवणे यांच्या कार्यालयाला विचारले असता, 'धनंजय धसे हे आमच्याकडे ऑन रेकॉर्ड कुठलेही स्वीय सहाय्यक म्हणून काम करत नाहीत.', असे स्पष्टीकरण देण्यात आले. मात्र, धसे हे दिल्ली व मुंबईतील कामकाज पाहतात, अशी माहिती कार्यकर्त्यांकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महाविकास आघाडीला मोठं खिंडार, अनेक बडे नेते, संरपंचांसह पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Asim Sarode On Atharva Sudame: अथर्व सुदामेसाठी असीम सरोदे मैदानात, थेट राज ठाकरेंना लावला फोन| पाहा व्हिडिओ

Pune Traffic: गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीत मोठे बदल; शहरातील मध्यवर्ती भागात जड वाहतूक बंद

Indian Festivals: दसऱ्यापासून ते दिवाळीपर्यंत; वाचा मुहूर्त, वार आणि तारीखसह सणांची यादी

Maharashtra Politics: निवडणुकीआधीच महायुतीत संघर्ष? शिंदेंच्या खात्यावर फडणवीस नाराज?

SCROLL FOR NEXT