Eknath Shinde-Devendra Fadnavis Latest News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंख्यमंत्री फडणवीस यांच्यात ऑल इज नॉट वेल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. फडणवीसांनी शिंदेंकडे असणाऱ्या नगर विकास खात्याबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. नगरविकास खात्याचा कारभार सुमार (CM Devendra Fadnavis criticizes Urban Development Dept) असून अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर सुधारणा कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत. केंद्र सरकारच्या योजनांबाबत पुनरावलोकन करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांनी नगर विकास विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस यांच्यामध्ये सर्व काही ठीक नसल्याची चर्चा रंगली आहे. मंत्री उदय सामंत यांनी हा दावा खोडून काढला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये सर्वा काही ठीक असल्याची प्रतिक्रिया सामंत यांनी दिली आहे. Is everything fine between Shinde and Fadnavis in Maharashtra?
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.