Balasaheb Thorat slams Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: अजित पवार तगडी आसामी, मात्र पोरासोरांना दमबाजी केली; बाळासाहेब थोरातांचा टोला

Balasaheb Thorat slams Ajit Pawar: लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा चौथ्या टप्पा परवा १३ मेला पार पडणार आहे. या टप्प्यात अहमदनगरमध्ये मतदान होणार असून तेथील प्रचाराचा तोफा आज थंडावल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन बनसोडे

अहमदनगर: लोकसभा निवडणुकाच्या मतदानाचा चौथ्या टप्पा १३ मे रोजी पार पडणार आहे. या टप्प्यात महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात मते मिळतील, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलाय. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना थोरातांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना टोला मारलाय. ते साम प्रतिनिधीशी बोलत होते.

अहमदनगर आणि शिर्डी येथे महाविकास आघाडीचा विजय होईल. तीन टप्प्यात झालेल्या मतदानात महाविकास आघाडीला मोठं यश मिळाले आहे. तसेच चौथ्या टप्प्यातही मोठ्या प्रमाणात मविआला मते मिळतील, असा विश्वास व्यक्त करताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी अजित पवार यांना टोला मारलाय. अहमदनगर येथील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना टोला मारला होता. त्यावरून बाळासाहेब थोरातांनी अजित पवार यांना उत्तर दिलंय.

अजित पवार तगडी आसामी आहेत, पण त्यांनी दमबाजी पोरासोरांबरोबर केली. अजित पवारांना ते धाडसी आहेत हे दाखविण्याची त्यांना खूप संधी होती. पण नुसतं निलेश लंकेंना दमबाजी करून काहीही होणार नाही. निलेश लंके यांना विजयी करण्याचा जनतेने निर्णय घेतलाय, असा टोला बाळासाहेब थोरातांनी त्यांना उत्तर देताना लगावलाय.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पारनेर विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली. यावेळी अजित पवार महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेवर बरसले. “निलेश बेटा, तू ज्या शाळेचा विद्यार्थी आहे, त्याचा मी हेडमास्तर आहे. यंदा तुझा कंड जिरवतो. तू खासदार कसा होतो, ते बघतोच”, अशा शब्दात अजित पवारांनी निलेश लंके यांचा समाचार घेत टीका केली होती.

अजित पवारांच्या या टीकेला आज बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिलं. त्याचबरोबर विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. महाविकास आघाडीला खूपच चांगलं यश मिळेल याची खात्री आहे. चौथ्या टप्यातही यश चांगलंच राहील. संपूर्ण महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडी बरोबर आहे.त्यामुळं आमचं यश निश्चित आहे. असा विश्वास बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: पंढरीच्या वाटेवर लुटमार अन् अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; पोलिसांनी २ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Maharashtra Live News Update: पुण्याला रेड अलर्ट, घाट भागात कोसळधार; हवामान विभागाचा अंदाज

Shahada Police : प्रायव्हेट खोल्या, सोफ्यावर कंडोम; शहाद्यात अवैध कॅफेवर पोलिसांचा छापा

अमेरिकेत पुराचा हाहाकार! 50 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; पाहा VIDEO

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

SCROLL FOR NEXT