Ashok Kharat Case Saam Tv
महाराष्ट्र

Ashok Kharat: खरात प्रकरणाचे लोण आता उपसभापतींच्या दारात? भविष्य जाणून घेण्यासाठी नीलम गोऱ्हे गेल्या भेटीला?

Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तृप्ती देसाईंनी नीलम गोऱ्हेंवर गंभीर आरोप केले आहेत. भविष्य जाणून घेण्यासाठी नीलम गोऱ्हे खराच्या भेटीला गेल्या होत्या असा आरोप त्यांनी केला.

Priya More

Summary -

  • अशोक खरात प्रकरणात नीलम गोऱ्हेंवर गंभीर आरोप

  • तृप्ती देसाईंनी केला गंभीर आरोप

  • भविष्य जाणून घेण्यासाठी नीलम गोऱ्हे खरातच्या भेटीला गेल्या होत्या

  • नीलम गोऱ्हेंकडून आरोप फेटाळले

सुप्रीम मसकर, साम टिव्ही न्यूज

भोंदूबाबा अशोख खरात प्रकरणात आता थेट विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंवर गंभीर आरोप करण्यात आलेत. नीलम गोऱ्हें आणि खरात यांच्यात खरचं आर्थिक संबंध होते का? गोऱ्हें आणि खरात यांच्यात भेट झालीय का? खरातला कोणते राजकीय नेत्याचं पाठबळ होतं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

वासनांध, भोंदू खरातच्या कारनाम्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. आधी राष्ट्रवादीच्या चाकणकराचं पद गेलं आणि आता या प्रकरणाची झळ थेट विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यापर्यंत पोहोचलीय. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन नीलम गोऱ्हेंवर गंभीर आरोप केलेत. खरातसोबत नीलम गोऱ्हेंचे आर्थिक संबंध असल्याचा आरोप करत गोऱ्हेंनी खरात प्रकरणावर मौन का धारण केलयं, असा थेट सवाल देसाईंनी विचारलाय.

नीलम गोऱ्हे 7 ते 8 वर्ष भोंदू खरातकडे जात होत्या. आमदारकी आणि मंत्रीपदासाठी भविष्य जाणून घेण्यासाठी गोऱ्हे नाशिकमधील एक्सप्रेस हॉटेलमध्ये खरातच्या भेटीला जात होत्या..ज्या ऑफिसमध्ये अनेक महिलांवर अत्याचार झाला, त्याच कॉलेज रोडवरील खरातच्या ऑफिसमध्ये नीलम गोऱ्हे अनेकदा गेल्यात गोऱ्हे आणि खरातमध्ये काही आर्थिक व्यवहार आहेत का? SITनं गोऱ्हेंचा CDR तपासावा, म्हणजे संभाषण उघड होईल.

दरम्यान तृप्ती देसाईंचे हे आरोप पत्रकार परिषद घेऊन नीलम गोऱ्हेंनी फेटाळून लावलेत. खरातच्या दरबारात राज्यातील तब्बल 39 आमदारांचा राबता होता, असा दावा याआधी केसरकरांनी केलाय.त्यात आर्थिक गैरव्यवहारात खरातला बड्या अधिकाऱ्यांनी मदत केल्याचाही आरोप आहे. अशातच चाकणकरांवरील कारवाईनंतर पुढचा नंबर कोणाचा? असा सवाल उपस्थित होतोय. एकीकडे गोऱ्हेंनी जरी आरोप फेटाळून लावले असले तरी तृप्ती देसाई गोऱ्हें आणि खरातच्या भेटीचे पुरावे माध्यमांसमोर आणणार का? आणि खरात आणि गोऱ्हेंचंही कनेक्शन समोर येणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय. मात्र गोऱ्हे आणि खरात कनेक्शन समोर आल्यानंतर केसरकरांमुळे अडचणीत आलेल्या शिंदेसेनेची आणखीच कोंडी होणार हे मात्र निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरातील विद्यार्थ्याला अखेर बदलून मिळाले Neet फेरपरीक्षेचे केंद्र

Mouni Roy: मौनी रॉयचा साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज; कर्व्ही फिगर फ्लाँट करत शेअर केले भन्नाट फोटो

Hardik Pandya : टीम इंडियाला सर्वात मोठा झटका; इंग्लंड वनडे मालिकेतून भरवशाचा खेळाडू बाहेर

LPG बुकिंगनंतरची चिंता संपली! गॅस सिलेंडर कधी येणार? आता मोबाईलवरच पाहा Live Delivery Status

व्यायाम करताना धाडकन जमिनीवर कोसळले; पोलीस कर्मचाऱ्याचा काही क्षणात मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT