Trupti Desai
Trupti DesaiSaam Tv

Trupti Desai: भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई झळकणार रुपेरी पडद्यावर; 'महिला टॉक' चित्रपटातून करणार सिनेविश्वात पदार्पण

Trupti Desai: महिलांच्या हक्कांसाठी नेहमीच अग्रस्थानी राहिलेल्या भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई आता एका वेगळ्या क्षेत्रात पदार्पण करत आहेत.'महिला टॉक' चित्रपटातून करणार सिनेविश्वात पदार्पण करणार आहेत.
Published on

Trupti Desai: महिलांच्या हक्कांसाठी नेहमीच अग्रस्थानी राहिलेल्या भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई आता एका वेगळ्या क्षेत्रात पदार्पण करत आहेत. सामाजिक आंदोलनांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या तृप्ती देसाई आता अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकणार आहेत. तृप्ती देसाई त्यांचा पहिला चित्रपट 'महिला टॉक‘ सिनेविश्वात पदार्पण’मधून सिनेविश्वात पदार्पण करणार आहेत.

‘महिला टॉक’ हा चित्रपट महिलांच्या घरगुती आणि सामाजिक आयुष्यातील वास्तवावर आधारित आहे. महिलांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठीचा संघर्ष आणि समाजातल्या त्यांच्या भूमिकेचं वास्तव या चित्रपटातून मांडलं जाणार आहे. तृप्ती देसाई या चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका साकारत असून, त्यांचा हा नवा अवतार प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार आहे.

Trupti Desai
Box Office Collection: 'कांतारा: चॅप्टर १' ची बॉक्स ऑफिसवर तुफान क्रेझ; ५०० कोटींच्या क्लबमध्ये लवकरच करणार एन्ट्री

या चित्रपटाची माहिती देण्यासाठी तृप्ती देसाई यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपल्या नव्या प्रवासाविषयी बोलताना सांगितले की, “मी अनेक वर्षे महिलांच्या हक्कांसाठी रस्त्यावर लढले आहे. आता तोच संदेश पडद्यावरून देण्याची वेळ आली आहे. ‘महिला टॉक’ हा फक्त एक चित्रपट नाही, तर महिलांच्या मनातील भावना, संघर्ष आणि आवाज यांचं प्रतीक आहे. या भूमिकेद्वारे मला प्रत्येक स्त्रीला स्वतःचा आवाज बुलंद करण्याची प्रेरणा द्यायची आहे.”

Trupti Desai
Akshay Kumar: डीपफेक व्हिडीओ प्रकरणात अक्षय कुमारला दिलासा; हायकोर्टाने दिले महत्वाचे आदेश

महिला टॉक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, महिलांच्या भावनांना, त्यांच्या आयुष्याला आणि त्यांच्यातील ताकदीला पडद्यावर मांडणारा हा सिनेमा ठरणार आहे. सामाजिक कार्यकर्तीपासून अभिनेत्रीपर्यंतचा हा प्रवास तृप्ती देसाईंसाठी जितका वेगळा, तितकाच प्रेरणादायी ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com