Maharashtra Politics  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ठाकरेंना कोकणात आणखी एक धक्का, राजन साळवींनंतर महत्वाच्या शिलेदाराने साथ सोडली

Another Setback for Thackeray in Konkan: सिंधुदुर्गात ठाकरे सेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला. ते कोणत्या पक्षामध्ये जाणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

Priya More

विनायक वंजारे, सिंधुदुर्ग

कोकणामध्ये ठाकरे गटाला सुरूंग लागला आहे. एकापाठोपाठ एक दिग्गज नेते उद्धव ठाकरेंची साथ सोडत आहेत. माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकल्यानंतर त्यांच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामे देत शिंदे गटामध्ये प्रवेश केला. आता राजन साळवीनंतर उद्धव ठाकरे यांच्या आणखी एका शिलेदाराने साथ सोडली. त्यामुळे ठाकरेंना कोकणामध्ये आणखी एक धक्का बसला आहे.

सिंधुदुर्गात ठाकरे सेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. 'आतापर्यंत शिवसैनिकांसाठी काम करताना प्रामाणिक आणि निष्ठेने न्याय देण्याचे काम केले. सध्या पक्षांतर्गत सुरू असलेल्या घडामोडीमुळे काम करणे शक्य वाटत नाही. यासाठी मी माझ्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देतोय.', असं त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.

संजय पडते यांच्या राजीनामा हा ठाकरे सेनेला मोठा धक्का मानला जात आहे. त्यांनी पुढील निर्णय लवकरच घेऊ असं देखील जाहीर केले आहे. संजय पडते हे नेमकं भाजपमध्ये की शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहे याची माहिती समोर आली नाही. अलीकडेच कुडाळमध्ये नगरसेवकांनीही राजीनामे देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. या पार्श्वभूमीवर संजय पडते यांचा राजीनामा महत्त्वाचा आणि ठाकरे सेनेला धक्का देणारा मानला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BDL Recruitment: दहावी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! सरकारी कंपनीत नोकरीची संधी; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने चांदीचे दर घसरले

Sleep Secrets: रात्री झोपताना एक पाय बाहेर काढण्याची सवय चांगली की वाईट? तज्ज्ञांनी सांगितली कारणे

धनत्रयोदशीनिमित्त मोठी खुशखबर! १० तोळं सोनं १९,१०० रूपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले

IMD Weather Alert: धनत्रयोदशीला आस्मानी संकट येणार, ४८ तास पाऊस धो धो कोसळणार, IMD कडून गंभीर इशारा

SCROLL FOR NEXT