Sharad Pawar- CM Shinde Meet SAAM TV
महाराष्ट्र

CM शिंदे-शरद पवारांच्या भेटीत बरंच काहीतरी दडलंय; राष्ट्रवादी-शिंदे गट आघाडीबद्दल सूचक वक्तव्य

भविष्यात शिंदे गट-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती होऊ शकते, असे संकेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिर्डी: राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार असा शिंदे गटातील आमदाराचा दावा, शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याची चर्चा, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची घेतलेली भेट आणि त्यानंतर या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांचे सूचक विधान यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार यांची भेट यात बरंच काही दडलंय, असं वक्तव्य मिटकरी यांनी केलं आहे. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट एकत्र येईल का, अशी चर्चा मिटकरींच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

महाराष्ट्राचं राजकारण (Maharashtra Politics) ढवळून काढणारे वृत्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट युतीचे संकेत दिले आहेत. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीत बरंच काही दडलं आहे, असं मिटकरी म्हणाले.

शरद पवार हे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होते. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे रुग्णालयात गेले होते. त्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली होती. या भेटीवर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिराला संबोधित करण्यासाठी शरद पवार हे शिर्डीत येतील. एकनाथ शिंदे यांनी पवार साहेबांची घेतलेली भेट यात बरंच काही दडलं आहे. कालची भेट ही भविष्यात काहीतरी वेगळं देऊन जाईल, असे ते म्हणाले. शहाजी बापू यांनी १२ आमदार फुटणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे १२ आमदार फुटणार पण ते कोणत्या बाजूचे हे त्यांनी चुकीचे सांगितले आहे, असेही मिटकरी म्हणाले. (Maharashtra News)

शरद पवार ३ तास मंथन शिबिरात थांबतील: प्रफुल्ल पटेल

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मंथन शिबिराच्या दुसऱ्या दिवशी साई समाधीचे दर्शन घेतले. शरद पवार आज मंथन शिबिरात तीन तास थांबणार असल्याची माहिती पटेल यांनी दिली.

साईबाबांची कृपा सगळ्यांवर राहो हीच साईंना प्रार्थना केली आहे. सर्वांना सुख लाभो हीच प्रार्थना आम्ही करत असतो, असे प्रफुल्ल पटेल यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: मराठी तरुणीला मारहाण प्रकरण, आरोपीच्या भावाचा तुरुंगातील मुक्काम वाढला; कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

Pune News : नवीकोरी स्कूटर महिन्यात खराब, पट्ट्याने शोरूमला नेली अन् पेटवून दिली, पुण्यातील घटना

Beed News: वाल्मिक कराडकडे सापडला स्पेशल फोन, भाजप आमदाराच्या दाव्याने खळबळ; बीड पोलिस संशयच्या भोवऱ्यात|VIDEO

Raigad : धक्कादायक! रायगडमध्ये उघड्या दरवाजाने एसटी धावली, व्हिडिओ व्हायरल

Gk : जगातील असे 7 देश जिथे कधीच होत नाही रात्र

SCROLL FOR NEXT