मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणून अकोलेकडे पाहिले जाते. अकोले तालुक्यात आदिवासींची संख्या जास्त आहे. सध्या अकोले विधानसभा मतदारसंघावर अजित पवार गटाची सत्ता आहे. अकोले विधानसभा मतदारसंघ हा अजित पवार गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सलग आठ वेळेस पिचड पिता-पुत्रांची सत्ता अकोलेमध्ये आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर पिचड १९८० ते २०१४ पर्यंत सलग सात वेळा अकोले मतदारसंघातून निवडून आले (Maharashtra Politics) होते. त्यानंतर २०१४ विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी पुत्र वैभव पिचड यांना रिंगणात उतरवलं होतं. अशारीतीने गेली ४० वर्ष अकोल्यात पिचड कुटुंबियांची सत्ता आहे. मात्र, मधुकर पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला अन् २०१९ मध्ये सत्ता त्यांच्या हातातून निघून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हातात गेली होती.
सध्या काय परिस्थिती?
यंदा अकोलेतून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अमित भांगरे यांचं नाव जवळपास निश्चित झालं असल्याचं मानलं जातंय. तर सध्या विधानसभेवर अजित पवार गटाचे उमेदवार किरण लहामटे यांची सत्ता आहे. निवडणूक लढविण्यासाठी भाजपचे नेते वैभव पिचड देखील इच्छूक आहेत, परंतु तेही महायुतीचे घटक असल्यामुळे त्यांच्यासमोर पेचप्रसंग निर्माण झाल्याचं दिसतंय. तर आता अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार कोण असेल? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं (Ajit Pawar Group Vs Sharad Pawar Group) आहे. महायुतीने आमदार किरण लहामटे यांना पुन्हा विधानसभेच्या रिंगणात उतरवलं, तर अजित पवार विरूद्ध शरद पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
आता अकोले विधानसभा मतदारसंघाची विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिचड पुन्हा एकदा आपला गड खेचून आणणार का ? शरद पवार आपलं वर्चस्व कायम ठेवणार? याकडे आता सगळ्या नगरकरांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे यंदा अकोल्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत सामना रंगण्याची शक्यता वर्तविली जातेय.
२०१९ ची विधानसभा निवडणूक
अकोले विधानसभा मतदारसंघ हा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा भाग (Akole Assembly constituency) आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार कॉंग्रेसचे उमेदवार किरण लहामटे आणि भाजपचे उमेदवार वैभव पिचड यांच्यात चुरशीची लढत झाली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉ. किरण यमाजी लहामटे १,१३,४१४ मतांनी विजयी झाले होते. तर भाजप उमेदवार वैभव मधुकरराव पिचड यांचा ५७, ६८९ मतांनी पराभव झाला होता. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर किरण लहामटे यांनी अजित पवारांची साथ दिली. त्यानंतर आता मतदारसंघ सध्या अजित पवार गटाच्या ताब्यात आहे.
२०१४ ची विधानसभा निवडणूक
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत वैभव पिचड यांनी शिवसेनेच्या मधुकर तळपाडे यांना धुळ चारत विधासभेमध्ये एन्ट्री केली होती. २०१४ विधानसभा निवडणुकीत वैभव पिचड यांनी शिवसेनेचे उमेदवार मधुकर तळपाडे यांचा २०,०६२ मतांनी पराभव केला (Vidhan Sabha Election 2024) होता. शिवसेना अन् भाजपमधील संघर्ष संपूर्ण अकोले तालुक्याने बघितला होता. पिचड पिता पुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे पिचड २०१४ साली भाजपच्या तिकीटावर विधानसभेच्या रिंगणात उतरले होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.