Ajit Pawar  saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar: विक्रमी अजितदादा! सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, पाहा राजकीय प्रवास

Ajit Pawar Political Journey: राज्यामध्ये आज महायुतीच्या सरकारची स्थापना होत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. तर अजित पवार उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

Priya More

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर १३ व्या दिवशी आज राज्यामध्ये नवं सरकारची स्थापना होत आहे. आज राज्याचे मुंख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईतल्या आझाद मैदानावर सायंकाळी साडेपाच वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

या शपथविधी सोहळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. तर अजित पवार उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. अजित पवार हे सहाव्यांदा उपमुख्यमंत्री होणार आहेत. अजित पवार हे अधिक वेळा उपमुख्यमंत्री झालेले एकमेव नेते आहेत. अजित पवार यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास आपण पाहणार आहोत...

अजित पवारांचे शिक्षण -

अजित पवार हे शरद पवार यांचे पुतणे आहेत. शरद पवार यांचे मोठे भाऊ अनंतराव पवार यांचे ते सुपुत्र आहेत. त्यांचा जन्म २२ जुलै १९५९ ला अहमदनगर जिल्ह्यातल्या देवळाली -प्रवरा येथे झाला. याचठिकाणी त्यांनी १०वी पर्यंतचे शिक्षण घेतलं. त्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी मुंबईत पूर्ण केले. त्यांनी बी.कॉम ही पदवी मिळवली. त्यांनी पद्मसिंह पाटील यांची बहीण सुनेत्रा यांच्यासोबत लग्न केलं. त्यांना पार्थ आणि जय ही २ मुलं आहेत.

बारामतीतून राजकीय प्रवास सुरू -

अजित पवार यांनी १९८२ साली राजकारणामध्ये प्रवेश केला. १९९१ मध्ये अजित पवार यांची पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूक लढवल्या. १९९५ पासून ते २०२४ पर्यंत सलग ८ वेळा त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते आमदार झालेत. अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्री, जलसंपदामंत्री आणि ऊर्जामंत्री म्हणून काम करण्याचा दांडगा अनुभव आहे. अजित पवारांचे नाव राज्यातील प्रमुख नेत्यांमध्ये घेतले जाते.

असा राहिला अजित पवारांचा राजकीय प्रवास -

- १९९१ साली अजित पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. या काळात ते कृषीमंत्री, फलोत्पादन मंत्री आणि उर्जा या खात्याचे राज्यमंत्री होते.

- १९९१ ते १९९५ या काळात ते विधानसभा सदस्य राहिले होते.

- नोव्हेंबर १९९२ ते फेब्रुवारी १९९३ या काळात अजित पवार जलसंधारण, ऊर्जा आणि नियोजन या खात्याचे राज्यमंत्री राहिले होते.

- १९९१ पासून अजित पवार हे विधानसभा सदस्य आहेत.

- १९९९ ते २००४ या काळात ते पाणीपुरवठा आणि स्वच्छता, पाटबंधारे आणि फलोत्पादन या खात्याचे राज्यमंत्री राहिले होते.

- त्यानंतर १९९५ पासून ते २०२४ पर्यंत ते सलग ८ वेळा बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. २०१० पर्यंत ते जलसंपदा मंत्री होते.

- अजित पवार जलसंपदामंत्री असताना २०१४ मध्ये सिंचन प्रकल्पांमध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचे आरोप करण्यात आले होते.

- काँग्रेस आघाडीची सत्ता असताना अजित पवार दोन वेळा उपमुख्यमंत्री झाले.

- २०१९ मध्ये अजित पवार यांनी भाजपशी युती करत पहाटे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण ३ दिवसांत राजीनामा देत ते पुन्हा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले.

- पण तेव्हाच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार पडले. त्यानंतर जुलै २०२३ मध्ये अजित पवारांनी पुन्हा बंड करून शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले.

- आज ते पुन्हा महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT