आगामी विधानसभा निव़डणुकीच्या पार्श्वभुमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. यावेळी, अमित शहांनी महायुतीमधील नेत्यांसोबत जागावाटपाबाबत चर्चा केल्याचं सांगितलं जातंय.
अजित पवार यांनी राज्यात बिहार पॅटर्न राबवण्याचे आणि त्यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव अमित शहांसमोर ठेवल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. विमानतळावर घेतलेल्या बैठकीमध्ये अमित शहांसमोर हा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. मात्र या चर्चा अजित पवारांनी फेटाळल्यात.
राज्यात नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी जागावाटपाचा मुद्दा सोडवावा लागणार आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करत असताना दिसतायत..तर एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असं शिवसेनेकडून वारंवार सांगितलं जात आहे. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्यास इच्छूक असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान अजित पवार म्हणत असलेला बिहार पॅटर्न काय तेही पाहूया.
ऑक्टोबर-नोव्हेंबर 2020 मध्ये बिहार विधानसभा निवडणूक
जनता दलाचे (संयुक्त) प्रमुख नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन
निवडणुकीत भाजपला 74 आणि जनता दलाला 43 जागा
‘मोठा भाऊ’ असूनही भाजपनं नितीशकुमारांना मुख्यमंत्रिपद दिलं
भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी पडद्यामागे जोरदार तयारी सुरु असल्याचं समोर आलंय. अद्याप जागावाटप झालेलं नाही, दुसरीकडे दादा दबावाचं राजकारण करतायत का अशा चर्चा रंगल्यात. त्यामुळे जागावाटपा आधीच मुख्यमंत्रिपदावरुन शीतयुद्ध रंगतंय की काय अशी शंका आहे?
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.