Rajendrasingh Somvanshi joins BJP in presence of Navneet and Ravi Rana at Amravati. Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar: अजित पवारांना भाजपचा दणका; 20 वर्षांच्या निष्ठावंताने हाती घेतले कमळ

Amravati BJP Strengthens Ahead Of Municipal Elections: चिखलदराचे माजी नगराध्यक्ष राजेंद्रसिंग सोमवंशी यांनी नवनीत राणा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. अजित पवार गटाला अमरावतीत मोठा धक्का बसला आहे.

Omkar Sonawane

चिखलदराचे माजी नगराध्यक्ष राजेंद्रसिंग सोमवंशी यांचा भाजपात प्रवेश.

नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार.

अजित पवार गटाचे समर्थक असूनही अचानक भाजपाशी हातमिळवणी.

आगामी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला अमरावतीत मोठा झटका.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजले असून राज्यभरात पक्ष प्रवेशाचा जोरदार धडाका सुरू आहे. अशातच चिखलदराचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र सिंह सोमवंशी यांनी आज अचानक भाजपचा झेंडा हाती घेतल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अचानक झालेल्या या पक्षप्रवेशामुळे राजकीय शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

अमरावतीतील अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार संजय खोडके यांचे कट्टर समर्थक राजेंद्रसिंग सोमवंशी, आल्हाद कालोटी आणि चिखलदरा नगर परिषदेतील सलग वीस वर्षे नगरसेवक राहिलेले राजेश मंगलेकर यांच्यासह भाजपचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अनेक कार्यकर्ते भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांच्या अमरावतीतील गंगा सावित्री निवासस्थानी भाजपमध्ये सामील झाले.

यावेळी युवा स्वाभिमान पार्टीचे बडनेरा विधानसभा आमदार रवी राणा यांनी राजेंद्र सिंग सोमवंशी यांचे स्वागत केले. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला अमरावतीमध्ये मोठा झटका बसला आहे.

राजेंद्रसिंग सोमवंशी यांनी चिखलदरा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष म्हणून नेतृत्व केले आहे. त्यांच्या पत्नी देखील विजया राजेंद्र सिंग सोमवंशी या देखील नगराध्यक्ष होत्या. राजेंद्र सोमवंशी यांना चिखलदरा नगरपरिषद नगराध्यक्षपदाची भाजपाने जाहीर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Politics : बिहारच्या विजयानंतर भाजपची मोठी कारवाई; आमदार, माजी केंद्रीय मंत्र्यांसहित तिघे पक्षातून निलंबित

Famous Artist Death: थराररक! 'गेम ऑफ थ्रोन्स'च्या प्रसिद्ध आर्टिस्टचा २९ व्या वर्षी मृत्यू; सिंहाने जबडा खाल्ला

Maharashtra Politics: परिवाराचा नाही तर..., बिहार निकालानंतर राज्याचं राजकारण तापलं; मुंबईमध्ये बॅनर वाॅर|VIDEO

Maharashtra Live News Update: मनमाड बायपासवर गावकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन अखेर मागे

Winter Health Tips: हिवाळ्यात कोणते पदार्थ खाऊ नये?

SCROLL FOR NEXT