

सोलापूर जिल्हा बँकेचे सलग ३५ वर्ष संचालक
सिद्रामप्पा पाटील यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून कार्य केलंय.
उपचारादरम्यान सिद्रामप्पा पाटील यांचे निधन झाले.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा पाटील यांचे निधन झाले आहे. गुरुवारी रात्री सोलापुरातील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे वय ८८ वर्ष होते. सिद्रामप्पा पाटील यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातील शोकाकूल वातावरण आहे. काही दिवसापूर्वी त्यांची तब्येत खालावली होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने अक्कलकोट तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
पार्थिवावर अंत्यसंस्कार शुक्रवारी दुपारी ३ वाजता मूळ गावी कुमठे येथे होणार आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक मान्यवर नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात भाजप पक्षाची मजबूत बांधणी केली. पक्ष वाढीसाठी कामे केली. सिद्रामप्पा पाटील हे स्व. गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात.
गावच्या सरपंचपदापासून आमदारपदापर्यंतचा कर्तृत्ववान प्रवास होता.
पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून कार्य.
सोलापूर जिल्हा बँकेचे सलग ३५ वर्ष संचालक, एकवेळ उपाध्यक्ष.
श्री स्वामी समर्थ साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि मार्केट कमिटी सभापती.
अक्कलकोट तालुक्यात भाजपाची मजबूत बांधणी करण्याचे श्रेय
सहकार क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी काम करणारे खंबीर नेतृत्व.
वयाच्या ८७व्या वर्षापर्यंत राजकीय-सामाजिक कार्य सातत्याने सुरु.
दोन वर्षापूर्वी अक्कलकोट बाजार समितीची निवडणुकींच मैदान मारलं
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.