Maharashtra Politics  x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : महायुतीमध्ये दरार पडणार? राज्यातील दोन बड्या नेत्यांमध्ये खडाजंगी

Maharashtra Political News : साताऱ्यात महायुतीत दरार पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री मकरंद पाटील यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

Yash Shirke

  • साताऱ्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्यातील शीतयुद्धामुळे महायुतीत दरार पडण्याची चर्चा रंगली आहे.

  • गोरे यांनी मकरंद पाटील यांच्या मतदारसंघात सभा घेत नाव न घेता डिवचणारी टीका केली, तर पाटील यांनीही प्रत्युत्तर देत गोरे यांना टोला लगावला.

  • दोघांचे कार्यक्रम आणि टीका-प्रत्युत्तर यामुळे अजित पवार गट व भाजपमध्ये ठिणगी पडल्याचे बोलले जात असून पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष आहे.

ओंकार कदम, साम टीव्ही, प्रतिनिधी

Maharashtra : राज्यातील सातारा जिल्ह्यात महायुतीमध्ये दरार पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्यात खडाजंगी सुरु आहे. दोघांनी एकमेकांच्या मतदार संघात राजकीय कार्यक्रम घ्यायला सुरुवात केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्या शीतयुद्धाची चर्चा रंगू लागली आहे.

काही दिवसांपूर्वी मंत्री जयकुमार गोरे यांनी मकरंद पाटील यांच्या वाई मतदारसंघातील बावधनमध्ये एका कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. त्यांनी मंत्री मकरंद पाटील यांचे नाव न घेता टीका केली होती. कोणीही बाभळीच्या झाडाखाली उभे राहत नाही. त्याला आंब्याची सावली लागते. बावधन गावाची ताकद राजकारण बदलवण्याची आहे आजची सभा परिवर्तनाची, असे म्हणत गोरे यांनी मकरंद पाटलांना डिवचले होते.

या घडामोडीनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांनी देखील उद्या मंत्री जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेतल्यामुळे महायुतीमध्ये ठिणगी पडल्याची चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमाविषयी विचारल्यावर मकरंद पाटील यांनी जयकुमार गोरे हे त्यांचा पक्ष वाढवत आहेत, मी माझा पक्ष वाढवतोय, असे वक्तव्य केले.

वाईचे मतदार मला नेहमीच वाढीव मताधिक्याने मतदान करत असतात. मी दोन, तीन हजाराने निवडून आलो नाही, असा टोला मंत्री मकरंद पाटील यांनी जयकुमार गोरे यांचे नाव न घेता लगावला. या एकूणच परिस्थितीमुळे सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये खडाजंगी सुरु असल्याचे म्हटले जात आहे. हे शीतयुद्ध लवकरच थांबेल की वाढेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केडीएमसी निवडणुकीत महायुती होणार; शिवसेना भाजप जागावाटपाबाबत बैठका सुरू

नमो भारत एक्स्प्रेसमध्ये शरीरसंबंध ठेवले, आता अंगाशी येणार; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरूण-तरुणीवर गुन्हा

Mobile Ban: महिलांना स्मार्टफोन वापरण्यास बंदी; १५ गावातील ग्रामपंचायतींचा तालिबानी आदेश

WPL 2026: छोटा पॅकेट, बडा धमाका! वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या फलंदाजाला दिल्ली कॅपिटल्सनं केलं कॅप्टन

Wednesday Horoscope : शांतपणे आपला पल्ला गाठाल; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात बुधवारी चांगल्या गोष्टी घडणार

SCROLL FOR NEXT