ajit pawar sharad pawar x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : अजित पवारांच्या नेत्याकडून शरद पवार गटातील नेत्याला जीवे मारण्याची धमकी

Maharashtra Political News : राष्ट्रवादी अजित पवार गटातील तालुका अध्यक्षाने शरद पवार गटातील कार्याध्यक्षाला धमकी दिली आहे. मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावरुन हे धमकी प्रकरण सुरु झाल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या इंदापूरमधील तालुकाध्यक्षाने राष्ट्रवादी शरद पवार गटातील कार्याध्यक्षाला धमकी दिल्याचे माहिती समोर आली आहे. या तालुकाध्यक्षाने एका वर्षापूर्वी अशीच धमकी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना दिली होती. यामुळे पुण्यात धमकीच्या राजकारणाला सुरुवात झाल्याचे म्हटले जात आहे.

इंदापूर तालुक्याचे अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी शरद पवार यांच्या गटातील कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांना धमकी दिली आहे. नवनिर्वाचित कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याबरोबर बोलाल, तर हाताखालून काढू असे म्हणत महारुद्र पाटील यांना मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

रमी प्रकरणामुळे माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिमंत्रीपद काढून दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आले. दत्ता भरणेंकडील क्रीडा खात्याची जबाबदारी कोकाटेंकडे देण्यात आली. कृषिमंत्रीपद मिळल्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे राज्यात कृषिमंत्रीपद आणि वाद असे समीकरण तयार झाले असल्याचे म्हटले गेले.

दत्तात्रय भरणे यांनी 'सरळ काम सगळेच करतात, एखाद काम वाकड करुन परत ते सरळ जे करतात, त्यांची नोंद ठेवली जाते', असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरुन शरद पवार गटाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी भरणे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावरुन हनुमंत कोकाटे यांनी महारुद्र पाटील यांना धमकावले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Film Awards Festival: मराठी चित्रपट सोहळ्यात राडा; CM फडणवीसांच्या भाषणावेळी घोषणाबाजी

Maharashtra Politics: शिक्षक, नोकरभरतीनंतर आता पक्षप्रवेश घोटाळा?

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ, 'खालिद का शिवाजी' सिनेमावरून आंदोलक आक्रमक

Manoj Jarange: जरांगेचं पुन्हा चलो मुंबई, 29 ऑगस्टला मराठा मोर्चा मुंबईत धडकणार

PMPMLच्या ताफ्यात येणार 1200 इलेक्ट्रिक बस; सुरक्षित प्रवासासाठी राबवणार 'झिरो ब्रेकडाऊन' पॉलिसी

SCROLL FOR NEXT