Maharashtra Politics  x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, महिला नेत्या करणार अजित पवार गटात प्रवेश

Maharashtra Political News : राज्यात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे या हजारो कार्यकर्त्यांसह अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

Yash Shirke

  • राज्यात काँग्रेसला अजित पवारांचा धक्का

  • काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षा करणार राष्ट्रवादीत प्रवेश

  • १७ ऑगस्ट रोजी पक्षप्रवेश होणार

Maharashtra : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष मोर्चेबांधणीला लागला आहे. पुढील काही महिन्यात निवडणुका होणार असल्याचे म्हटले जात आहे. निवडणुकांपूर्वी राज्यामध्ये काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. काँग्रेसमधील महिला नेत्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटात प्रवेश करणार आहेत.

काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी उपाध्यक्षापदाचा राजीनामा दिला होता. हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. प्रतिभा शिंदे या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटात प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. शेकडो पदाधिकारी, २० ते २५ हजार कार्यकर्त्यांसह प्रतिभा शिंदे अजित पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत.

प्रतिभा शिंदे काँग्रेस पक्षात नाराजी असल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसमध्ये ज्या आशा-अपेक्षा घेऊन गेले होते, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला. पक्षाच्या बैठकांना बोलावले जात नव्हते. पद असूनही काम करु दिले जात नव्हते, असे वक्तव्य प्रतिभा शिंदे यांनी केले.

१७ ऑगस्ट रोजी जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. वीस हजारांहून जास्त कार्यकर्तेही काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती प्रतिभा शिंदे यांनी दिली. काम करण्यासाठी पदाची गरज असते, तेव्हा पक्षप्रवेशानंतर पद मिळावे अशी अपेक्षाही प्रतिभा शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विठ्ठल- रूक्मिणी मंदिरावर विद्युत रोषणाई

Airtel: कमी किंमतीत जास्त डेटा! महिन्याचा प्लॅन ६० जीबी डेटा आणि जबरदस्त बचत

खुशखबर! ICICI बँकेने मिनिमम बँलेंसची लिमिट घटवली, आता अकाउंटमध्ये एवढे पैसे ठेवावे लागणार

Maharashtra Rain: मुंबईत तुफान पाऊस, पुढचे ३ ते ४ तास महत्वाचे; कोकण- विदर्भ आणि मराठवाड्याला ऑरेंज अलर्ट, कुठे काय परिस्थिती?

Hadapsar Terminal: पुणेकरांसाठी गुड न्यूज! हडपसरवरून धावणार ८ नवीन रेल्वे, कधीपासून होणार सुरू?

SCROLL FOR NEXT