Maharashtra Politics  x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : अजित पवारांना मोठा धक्का! बड्या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

Maharashtra Political News : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागपूरमध्ये चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरानंतर नागपूरच्याच जिल्हाध्यक्षाने राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.

Yash Shirke

पराग ढोबळे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Maharashtra : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिर आटोपताच नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष शिवराज बाबा गुजर यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. नाराजीतून त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे म्हटले जात आहे. चिंतन शिबिरानंतर शिवराज बाबा गुजर यांच्या राजीनाम्यामुळे अजित पवार गटाला धक्का बसला आहे.

शिवराज बाबा गुजर यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी पक्षांतर्गत खळबळ उडवून दिली आहे. गेल्या काही काळापासून राष्ट्रवादीचे मंत्री नागपूरात येतात. पण स्थानिक पदाधिकारी यांना सन्मान मिळत नाही. याच नाराजीतून त्यांनी राजीनामा दिल्याचे म्हटले जात आहे. ते मागील आठ वर्षांपासून नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष होते.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या चिंतन शिबिराचे नागपुरात आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सूचना देऊनही दुसऱ्या दिवशी होणाऱ्या क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कार्यक्रमाला माहिती सुद्धा देण्यात आली नाही. त्यामुळे चिंतन शिबिरात कितीही कान टोचले असले तरी जैसे थे परिस्थिती असल्याचा दावा शिवराज बाबा गुजर यांनी केला आहे.

शिवराज बाबा गुजर यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला आहे. त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजर यांनी दिलेला राजीनामा पक्ष स्वीकारतो की त्यांना काही दिवस थांबण्याचा सल्ला दिला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दारूचे व्यसन आणि पत्नीच्या उपचाराचा नावावर घरफोडी करणाऱ्या एका सराईत आरोपी अटक

Manoj Jarange: मुंडक्यावरच पाय द्यावा लागेल; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मनोज जरांगे भडकले|VIDEO

आणखी एका पोलीस अधिकाऱ्यानं आयुष्य संपवलं, सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वत: वर गोळी झाडली, धक्कादायक कारण समोर

Diwali Travel Tips: दिवाळीत ट्रेनमधून प्रवास करताय? या वस्तू चुकूनही घेऊन जाऊ नका

Gujarat News : गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड; 10-11 मंत्र्यांचा राजीनामा, प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या पत्नीला मिळणार महत्वाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT