Amol Mitkari NCP Saam T
महाराष्ट्र

Maharashtra Politics: काँग्रेसचे ७, शरद पवार गटाचे ५ आमदार अजित पवार गटाच्या संपर्कात; अमोल मिटकरी यांचा दावा

Amol Mitkari : अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी एक मोठा दावा केलाय. मिटकरी यांच्या दाव्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू झाली. काँग्रेस आणि शरद पवार गटातील आमदार अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याचं म्हटलंय.

Bharat Jadhav

(सचिन गाड, मुंबई)

Ajit Pawar Group Leader Amol Mitkari :

राज्यात आणखीन एक राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू झालीय. ही चर्चा सुरू होण्याचं कारण ठरलं अजित पवार गटाचे नेते आमदार अमोल मिटकरी यांचा दावा. काँग्रेस आणि शरद पवार गटातील आमदार आमच्या संपर्कात असून ते लवकर अजित पवार गटात प्रवेश करतील, असा दावा अमोल मिटकरी यांनी केलाय. (Latest News)

साम टीव्हीच्या प्रतिनिधीशी बोलताना अमोल मिटकरींनी हा दावा केलाय. काँग्रेस पक्षाचे ७ आणि शरद पवार गटाचे ५ आमदार लोकसभा निवडणूकीपूर्वी अजित पवार गटात येतील, असा दावा प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केलाय. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झालीय. लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील नेते भाजपची वाट धरू लागले आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील महायुतीतही मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

साम प्रतिनिधींशी बोलताना मिटकरींनी बारामतीमध्ये कोणाला उमेदवारी मिळेल, तसेच लोकसभेच्या जागा कितमी मिळाव्यात याचे सुतोवाच केले आहे. बारामतीत अजित पवार दादा म्हणतील ते होईल. तिथला सगळं विकास दादांनी केलाय. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यावी, अशी आमची मागणी असल्याचं मिटकरी म्हणाले. लोकसभेला १० जागा मिळाव्यात असा आमचा आग्रह असल्याचं ते म्हणाले.

काही दिवसांपूर्वी माजी आमदार, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत अजित गटात प्रवेश केला. त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बीडमध्ये रक्षकच बनले भक्षक! मुंबईच्या सराफ व्यापाऱ्याला धमकावत उकाळले ४ लाख

Tere Ishq Mein: 'तेरे इश्क में'च्या रिलीजपूर्वी क्रिती सॅनन आणि धनुष पोहोचले वाराणसीला, गंगा आरतीचे फोटो व्हायरल

राणेंचं स्टिंग ऑपरेशन, महायुतीची पोलखोल, भाजप कार्यकर्त्याच्या घरात पैशांची बॅग

नोकरी सोडल्यानंतर किती दिवसांत फुल अँड फायनल सेटलमेंटची रक्कम मिळणार? जाणून घ्या नव्या कामगार कायद्याचे नियम

Mahavatar Narsimha: 'महावतार नरसिंह' ऑस्करच्या शर्यतीत; 'डेमन हंटर्स'सह 'या' पाच चित्रपटांना देणार टक्कर

SCROLL FOR NEXT