पराग ढोबळे, नागपूर|ता. १ ऑगस्ट २०२४
लोकसभा निवडणुकांनंतर काँग्रेसने पक्षातील बंडखोरांवर कडक कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. यासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली असून काँग्रेसने रामटेक लोकसभा मतदार संघातील ६ पदाधिकाऱ्याचे पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबन केले आहे. लोकसभेत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर काँग्रेसने मोठी कारवाई केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर जिल्ह्यातील कुही काँग्रेस शहर अध्यक्षांसह नगराध्यक्ष, उपाध्यक्ष यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे.
कुही शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष विलास राघोर्ते, नगरपरिषद अध्यक्ष हर्षा इंदूरकर, उपाध्यक्ष अमित ठाकरे, नगरसेवक रुपेश मेश्राम, मयूर तळेकर, निशा घुमरे यांच्यावर ही अशी निलंबित नेत्यांची नावे आहेत. लोकसभेत बंडखोरी केलेल्या राजू पारवे यांना मदत केल्याचा ठपका ठेवत काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या अहवालानंतर नाना पटोले यांच्या निर्देशावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या रामटेक लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये बंडखोरी पाहायला मिळाली होती. काँग्रेसने रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिल्यानंतर आमदार राजू पर्वे यांनी बंडाचा झेंडा फडकावला होता. राजू पारवे यांनी विधानसभा आमदारकीचा राजीनामा देत शिंदे गटातून लोकसभा निवडणूक लढवली होती. निवडणुकीत राजू पारवे यांना मदत केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसने ही कारवाई केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.