Maharashtra Politics 2024  Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics 2024 : लोकसभा निकालानंतर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय ठिणग्या; काँग्रेस-शिवसेनेत उडाला पहिला खटका, कारण समोर

Sandeep Gawade

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर जागा वाढल्याच्या आनंदाचा महाविकास आघाडीतील घटकपक्षांकडून जल्लोष साजरा होत असतानाच, यशाचं श्रेय आणि विधानपरिषदेच्या जागांवरून 'फटाके' फुटण्यास सुरुवात झाली आहे. विशेषतः काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात खडाजंगी सुरू झाली आहे. ठाकरे गटाकडून चार जागांवरचे उमेदवार जाहीर करण्यात आल्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भर पत्रकार परिषदेतच जाहीर नाराजी बोलून दाखवली. अजूनही वेळ गेली नाही, असं सांगतानाच शिवसेनेला अप्रत्यक्ष इशाराही दिल्याचं मानलं जातं.

उद्धव ठाकरेंनी आधी दोन जागा जाहीर केल्या होत्या. मात्र आमची कोकण आणि नाशिकमध्ये तयारी आहे असं मी त्यांना सांगितलं होतं. त्यावर बसून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मुंबईत आम्ही अजून अर्ज केलेला नाही, त्यामुळे अजूनही वेळ गेली नसल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. मी स्वतः मातोश्रीवर सकाळपासून फोन लावला होता. पण अजून संपर्क झालेला नाही. आमचे खासदार भेटायला जातात ‌त्यात गैर नाही. जागावाटप हा वेगळा मुद्दा आहे. आमची भूमिका जुळवून घ्यायची आहे. आम्ही अजूनही एकजुटीनं लढत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

अंबादास दानवे काय म्हणाले?

शिवसेनेची राज्यात वेगळी ताकद आहे, चांगलं संघटन आहे. लोकसभा निवडणुकीतही ते दिसून आलं. त्यामुळे विधानपरिषदेच्या ४ जागांवर उमदेवार दिलेले आहेत. नाना पटोले म्हणत असतील उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क होत नसेल, मात्र आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे इतर नेते आहेत. त्यांच्याशी संपर्क केला तरी चालंलं असतं. आमच्याही कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या काही भावना आहेत. त्याची दखल घेतली गेली पाहीजे असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

मोहन भागवत यांच्यावरही केली टीका

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी निवडणुका झाल्या आता सत्ताधारी आणि विरोधकांनी मणिपूर आणि देशातील परिस्थितीचा विचार करावा असा सल्ला दिला होता. त्यावर नाना पटोले यांनी टीका केली आहे. मोहन भागवत यांनी सल्ला द्यायची गरज नाही, संघ आणि भाजपा असल्याचं ते म्हणाले. आता नड्डा यांनी सांगितल्यावर संघाची भाजपला गरज नाही असं वाटतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 5 Winner: अखेर तो क्षण आला! 'सुरज'चा गोलीगत विजय, ठरला बिग बॉस मराठी 5 व्या पर्वाचा विनर; मिळाले 'इतके' लाख रुपये

IND vs BAN: अर्शदीप सिंगच्या गतीसमोर बांगलादेशचा सुपडा साफ; भारतापुढे माफक आव्हान

Marathi News Live Updates : उद्योजक जितेंद्र तोरणे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, श्रीरामपूरमधून उमेदवारीसाठी इच्छुक

Ashok Saraf: महाराष्ट्राच्या महानायकाची पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर धमाकेदार एन्ट्री

Arabian Sea Shiv Smarak : अरबी समुद्रात शिवस्मारकाचा संभाजीराजेंकडून शोध, जलपूजन झालेलं शिवस्मारक गेलं कुठं?

SCROLL FOR NEXT