Maharashtra Politics 2024 Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics 2024 : मुख्यमंत्र्यांची राऊतांना नोटीस; संजय राऊतांना 'रोखठोक' भोवणार?

Maharashtra Politics 2024 Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांना कायदेशीर नोटीस पाठवलीय. राऊतांनी शिंदेंवर अजित पवारांच्या उमेदवारांना पाडण्यासाठी पैसे वाटल्याचा आरोप केला होता. या नोटीशीलाही राऊतांनी आक्रमक उत्तर दिलंय.

Sandeep Gawade

विनोद पाटील, साम टीव्ही प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांना कायदेशीर नोटीस पाठवलीय. राऊतांनी शिंदेंवर अजित पवारांच्या उमेदवारांना पाडण्यासाठी पैसे वाटल्याचा आरोप केला होता. या नोटीशीलाही राऊतांनी आक्रमक उत्तर दिलंय. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गटातला संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

लोकसभेचं मतदान संपलं. मात्र ठाकरे आणि शिंदे गटातला संघर्ष आणखीनच तीव्र झालाय. ठाकरे गटाच्या मुखपत्रातून संजय राऊतांनी रोखठोक या सदरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या आरोपांची गंभीर दखल घेतलीय. एकनाथ शिंदेंनी थेट राऊतांना थेट कायदेशीर नोटीस पाठवलीय. 3 दिवसांत माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा शिंदेंना राऊतांना दिलाय. नेमकं काय म्हटलंय नोटीशीत ते पाहूयात.

अजित पवारांचे उमेदवार निवडून येऊ नयेत म्हणून शिंदेंकडून 25 ते 30 कोटींचं वाटप केल्याचे बेछूट आरोप ठाकरे गटाच्या मुखपत्रातून करण्यात आले. स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी शिंदेंची बदनामी केली. 3 दिवसांत माध्यमांसमोर बिनशर्त माफी मागा. अन्यथा तुमच्या आणि मुखपत्राविरोधात फौजदारी तसंच दिवाणी कारवाई करू. मात्र या नोटीशीलाही राऊतांनी आक्रमकपणे उत्तर दिलंय. उलटा चोर कोतवाल को डाटे असं ट्विट करून शिंदेंना टोला लगावलाय. काय म्हटले आहेत राऊत ते पाहूयात.

राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर यापूर्वीही आर्थिक स्वरूपाचे आरोप केले आहेत. मात्र महायुतीतले मित्र असलेल्या अजित पवारांच्या उमेदवाराला पाडण्यासाठीच पैसे वाटल्याचा आरोप शिंदेंचा चांगलाच जिव्हारी लागलाय़. त्यामुळे आता राऊत माफी मागतात की शिंदेंविरोधातला लढा कायदेशीर मार्गानं नेतात याबाबत उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimpri Chinchwad Police : फिल्मी स्टाईलने १५ किमी पाठलाग; सराईत चोरटा ताब्यात, साडेसहा लाखांचा ऐवज हस्तगत

Pune Police : भर दिवसा दरोडा टाकला, पुणे पोलिसांनी सिने स्टाईल दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या

Maharashtra Live News Update: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

IND vs PAK : पाकिस्तानविरोधात खेळावं की नाही, टीम इंडिया संभ्रमात, गौतम गंभीर म्हणाला...

Beed : जामीनावर सुटताच स्वागतासाठी फटाक्यांची आतिषबाजी; बीड शहरातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT