Maharashtra Politics: उमेदवारांची निवड चुकली, महायुतीची धाकधूक वाढली? विदर्भ आणि मराठवाड्यात गणित बिघडणार?

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्यापूर्वीच महायुतीच्या नेत्यांची धाकधूक वाढलीय. कारण तब्बल 9 ते 10 जागांवर उमेदवारांची निवड चुकल्याची जोरदार चर्चा महायुतीत रंगलीय. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांनाही आता विजयाची धास्ती लागलीय.
उमेदवारांची निवड चुकली, महायुतीची धाकधूक वाढली? विदर्भ आणि मराठवाड्यात गणित बिघडणार?
Eknath Shinde , Devendra Fadnavis, Ajit PawarSaam TV

विनोद पाटील, साम टीव्ही, प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीचा निकाल जसा जवळ येतोय, तसं महायुतीचं टेंशन वाढत चालल्याचं दिसतंय. राज्यात 45 प्लसची घोषणा महायुतीनं दिली खरी. मात्र ती प्रत्यक्षात येईल की, नाही याबाबत महायुतीच्या नेत्यांनाच खात्री नसल्याचं पुढं आलंय. महायुतीच्या 8 ते 10 जागांवर उमेदवारांची निवड चुकल्यानं महायुतीची धाकधूक वाढलीय. भाजप आणि शिवसेनेनं 8 ते 10 जागांवर वेगळे उमेदवार दिले असते, तर फायदा झाला असता, असा एक मतप्रवाह महायुतीच्या नेत्यांमध्ये आहे.

मतदारांमध्ये नाराजी असलेल्या खासदारांनाच तिकीट दिल्याचा फटका विदर्भात बसू शकतो. वर्धा, भंडारा-गोंदिया, गडचिरोलीत नवीन चेह-यांना संधी दिली असती तर अँटी इन्कबन्सीचा फटका टाळता आला असता असं मत भाजप पक्ष संघटनेतील विदर्भातल्या काहींचं म्हणणंय.

उमेदवारांची निवड चुकली, महायुतीची धाकधूक वाढली? विदर्भ आणि मराठवाड्यात गणित बिघडणार?
Raj Thackeray: लोकसभेनंतर राज ठाकरेंचं एकला चलो रे, विधानपरिषदेत मनसेचे 'डाव' खरे होणार?

महायुतीलल्या इतर मित्र पक्षांनीही दिलेल्या काही उमेदवारांबाबत गोंधळ झाल्याची चर्चाही नेत्यांमध्ये रंगलीय. यामुळे महायुतीचा प्रयोगच फसणार की काय अशी भीती नेत्यांना आहे. यात शिंदे गटानं लढवलेल्या जागांचा समावेश आहे.

शिंदे गटानं हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री यांना यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी देणं, बुलढाण्यात प्रतापराव जाधवांना पुन्हा उमेदवारी दिली. आता रविकांत तुपकारांच्या कामागिरीवर जाधवांचा विजयाचं गणित अवलंबून असल्याचं दिसतंय. दक्षिण मुंबईची जागा शिंदे गटाच्या यामिनी जाधवांऐवजी भाजपकडून राहुल नार्वेकर किंवा मंगलप्रभात लोढा यांनी लढवायला हवी होती.

उमेदवारांची निवड चुकली, महायुतीची धाकधूक वाढली? विदर्भ आणि मराठवाड्यात गणित बिघडणार?
Raj Thackeray: लोकसभेनंतर राज ठाकरेंचं एकला चलो रे, विधानपरिषदेत मनसेचे 'डाव' खरे होणार?

असाच गोंधळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीबाबत झाल्याची चर्चाही महायुतीत सुरू आहे. धाराशिवमध्ये भाजपचे आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना घड्याळवर लढवायला लावणं विरोधात जाऊ शकतं. तसंच शिरूरमध्ये शिंदे गटाच्या आढळराव पाटलांनाही आयात करून घ़ड्याळची उमेदवारी देण्याचा प्रय़ोगही फसणार की काय अशी शंका आहे. तर अजित पवारांच्या कोट्यातून रासपच्या महादेव जानकरांना परभणीच्या मैदानात उतरवणंही यशस्वी होईल की नाही याची धास्ती आहे.

महायुतीला मराठा आरक्षण आणि मुस्लिमांच्या ध्रुवीकरणाचा मुद्दा डोकेदुखी ठरण्याची शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात येत आहे. त्यात उमेदवारांची चुकलेली निव़ड विदर्भ आणि मराठवाड्यातल्या तब्बल 8 ते 9 जागांवर नुकसानकारक ठरणार का हे 4 जूनच्या निकालातच स्पष्ट होणार.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com