Raj Thackeray: लोकसभेनंतर राज ठाकरेंचं एकला चलो रे, विधानपरिषदेत मनसेचे 'डाव' खरे होणार?

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत मांडीला मांडी लावून बसणारे राज ठाकरे आता वेगळा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत. विधानपरिषद निवडणुकीत मनसेनं भाजपच्या विरोधात शड्डू ठोकले आहेत.
लोकसभेनंतर राज ठाकरेंचं एकला चलो रे, विधानपरिषदेत मनसेचे 'डाव' खरे होणार?
Raj Thackeray And Devendra FadnavisSaam Tv
Published On

तन्मय टिल्लू, साम टीव्ही, प्रतिनिधी

लोकसभेचा निकालही लागत नाही तोच विधान परिषदेवरुन महायुतीत खडाखडी सुरू झाल्याचं समोर येतयं. त्याला कारण ठरलंय राज ठाकरेंनी कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी अभिजीत पानसेंच्या नावाची केलेली घोषणा. ऐनवेळी राज ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केल्यामुळे, महायुतीच्या गोटात मिठाचा खडा पडल्याची चर्चा रंगली आहे.

लोकसभेत मोदींना बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी, भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मनसेकडून अभिजीत पानसेंची उमेदवारी जाहीर केली. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. कोकण पदवीधर हा भाजपचा पारंपारिक मतदारसंघ समजला जातो आणि याच मतदारसंघात निरंजन डावखरे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे राज ठाकरेंनी अचानक अभिजीत पानसेंचं नाव जाहीर करून भाजपची पुरती गोची केलीये.

लोकसभेनंतर राज ठाकरेंचं एकला चलो रे, विधानपरिषदेत मनसेचे 'डाव' खरे होणार?
Ajit Pawar On Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्या महाडमधील कृतीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे आता भाजपच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. मात्र भाजप आमदार मंत्री रवींद्र चव्हाणांनी महायुतीच्या उमेदवाराबाबत वरिष्ठच निर्णय घेतील, असं म्हटलं असलं तरी भाजप पारंपारिक जागा सोडणार का याबाबत त्यांनी सावध भूमिका घेतलीये.

लोकसभेनंतर राज ठाकरेंचं एकला चलो रे, विधानपरिषदेत मनसेचे 'डाव' खरे होणार?
Hasan Mushrif: मोठी बातमी! ससूनचे डीन विनायक काळे सक्तीच्या रजेवर, हसन मुश्रीफ यांच्याकडून कारवाई

आता कोकण पदवीधर मतदारसंघात कोण माघार घेणार आणि कोण मैदानात राहणार यापेक्षा मनसे भाजपला झुकवून पानसेंची उमेदवारी कायम ठेवून आपलं राजकीय वजन वाढवणार का हे महत्त्वाचं असेल. तसंच ही एकला चलो रेची भूमिका राज ठाकरे आगामी विधानसभेत काय ठेवणार का याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com