Hasan Mushrif: मोठी बातमी! ससूनचे डीन विनायक काळे सक्तीच्या रजेवर, हसन मुश्रीफ यांच्याकडून कारवाई

Sassoon Hospital Dean Vinayak Kale : पुणे हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याप्रकरणात राज्य सरकारने मोठी कारवाई केली आहे. ससून रुग्णालयाचे डीन विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
Hasan Mushrif: मोठी बातमी! ससूनचे डीन विनायक काळे सक्तीच्या रजेवर, हसन मुश्रीफ यांच्याकडून कारवाई
Hasan Mushrif On Pune Hit And Run Case saam tv
Published On

पुणे हिट अँड रन प्रकरणातील (Pune Hit And Run Case) आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याप्रकरणात राज्य सरकारने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी ससून रुग्णालयाचे (Sassoon Hospital) डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर आणि शिपायी अतुल घटकांबळे यांना निलंबित करण्यात आले आहे. तर ससूनचे डीन विनायक काळे (Dean Vinayak Kale) यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण शिक्षण मंत्री हसन मुश्रीम यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे.

हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणाच्या चौकशीसाठी डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली तीन जणांची समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल आला आहे. या अहवालानुसार डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना निलंबित करण्यात आले आहे. तर अधिष्ठाता विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. तर शिपायी अतुल घटकांबळे याला देखील निलंबित केले आहे.

Hasan Mushrif: मोठी बातमी! ससूनचे डीन विनायक काळे सक्तीच्या रजेवर, हसन मुश्रीफ यांच्याकडून कारवाई
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, संपूर्ण मुंबईत उद्यापासून ५ टक्के पाणीकपात

हसन मुश्रीफ यांनी पुढे संगितले आहे की, 'या प्रकरणात आम्ही सक्त कारवाई करू. ब्लड सॅम्पल बदलणे ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. यापुढे कुठल्याही सरकारी रुग्णालयात या गोष्टी होऊ नये म्हणून त्यांना आयुष्यात अशी शिक्षा देऊ की असे प्रकरण त्यांना पुन्हा करता येणार नाही अशी कारवाई करण्याचे आम्ही ठरवले होते. आमच्या समितीने योग्य अहवाल दिला त्यानंतर आम्ही ही कारवाई केली आहे.'

Hasan Mushrif: मोठी बातमी! ससूनचे डीन विनायक काळे सक्तीच्या रजेवर, हसन मुश्रीफ यांच्याकडून कारवाई
Pune Accident : अवघ्या २ तासांत तब्बल १४ कॉल, डॉ. तावरेवर कुणाचा दबाव? पुणे अपघात प्रकरणात चक्रावणारा खुलासा

'याप्रकरणात अटक असलेल्या डॉक्टरांची जोपर्यंत चौकशी होणार नाही. पूर्णपणे त्यांचे मत घेतले जात नाही तोपर्यंत शासनाकडून बडतर्फ केले जात नाही. पण पहिली पायरी आम्ही केली आहे. त्यांना योग्य धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही.', असे हसन मुश्रीफ यांनी खडसावून सांगितले. तसंच, याप्रकरणात कारवाई करण्यात उशीर झाल्याच्या आरोपावर बोलताना त्यांनी सांगितले की, 'मी काही दिवस परदेशात होतो मी २५ तारखेला आलो. २६ तारखेला मला घटना कळाली आणि मी तात्काळ त्यामध्ये लक्ष घातले.'

Hasan Mushrif: मोठी बातमी! ससूनचे डीन विनायक काळे सक्तीच्या रजेवर, हसन मुश्रीफ यांच्याकडून कारवाई
Pune Porsche Accident : ब्लड सॅम्पलची हेरफेर करणाऱ्या ससून रुग्णालयातील "त्या" दोन्ही डॉक्टरांचं निलंबन!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com