पुणे पोर्शे करा अपघात प्रकरणात दररोज नवनवीत माहिती समोर येत आहे. अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी कसे प्रयत्न केले गेले याबाबत खुलासे होत आहेत. ब्लड रिपोर्ट बदलणारे ससून रुग्णालयाचे दोन डॉक्टर सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
दरम्यान, अपघाताच्या दुसऱ्या दिवशी अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट तपासण्याआधी डॉ. अजय तावरे याच्या मोबाइलवर २ तासांत तब्बल १४ फोन आले होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे तावरेंना फोन करणारा तो व्यक्ती कोण? असा प्रश्न उपस्थित झाला.
पण पोलिसांनी या घटनेचा तपास लावला आहे. तावरेंना फोन करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कुणीही नसून तो विशाल अग्रवालच होता, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे. अल्पवयीन आरोपीचे रक्त नमुने घेण्याआधी सकाळपासून विशाल अग्रवाल याने डॉ. तावरे याला फोन केले होते.
तेव्हा आरोपीच्या वडिलांनी ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी डॉ. तावरेला पैशांचे अमिष दाखवले होते. त्यानंतर तावरे यानेच ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार बनवण्याचा प्लान आखला. यासाठी त्याने डॉ. हरनोर याची मदत घेतली. पैसे आणण्यासाठी एका शिपायाला पाठवले होते, अशी माहिती देखील समोर आली आहे.
आपलं फोनवरील संभाषण कुणाला कळू नये म्हणून दोन्ही आरोपींनी व्हॉट्सॲप द्वारे एकमेकांसोबत संवाद साधला. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने डॉ. तावरेचे व्हॉट्सॲप कॉल तपासल्यानंतर ही माहिती समोर आली.
दुसरीकडे पुणे पोलिसांनी अपघातग्रस्त पोर्शे कार पूर्णपणे पॅक केली आहे. गाडीचे तांत्रिक पुरावे नष्ट होऊ नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. पोर्शेचे जर्मनीचे प्रतिनिधी पुण्यात येण्याची येणार आहे. त्यानंतर या कारची तपासणी करण्यात येणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.