Maharashtra Politics 2024 Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics 2024 : भाजपचा विधानसभा निवडणुकीसाठी मेगाप्लान ! लोकसभेत अपेक्षित यश न मिळाल्यानं अलर्टवर, महत्त्वाच्या मुद्द्यालाच हात घातला

Assembly Election : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला म्हणावं तसं यश आलं नाही. केवळ ९ जागा निवडून आल्या. त्याची कारणं शोधण्यासाठी भाजपने राज्यातील ४८ मतदारसंघांमध्ये निरीक्षकांची नेमणूक केली आहे.

Sandeep Gawade

लोकसभा निवडणुकांआधी महाराष्ट्रात ४८ जागांपैकी ४५+ चा नारा देणाऱ्या भाजपला केवळ ९ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. या अपयशाची कारणं शोधण्यासाठी भाजप आणखी अलर्ट झाली असून 48 लोकसभा मतदारसंघात निरीक्षकांची नेमणूक केली आहे. निरीक्षकांकडून पराभवाचा रिपोर्ट तयार केला जाणार आहे. तसंच राज्यात मराठा समाजाचं प्राबल्य असलेल्या मतदारसंघातील जनतेची मतंही जाणून घेतली जाणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशावर चर्चा करण्यासाठी आणि विधानसभेची रणनिती ठरवण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली. यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. कुणीही गाफील राहू नका, विरोधकांना कमी समजू नका, असं आवाहन करण्यात आलं आहे.

भाजपने लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी लढवली जात असल्याचा प्रचार केला होता. मीशन २०४७ साठी ४०० पारचा नारा दिला होता. तर महाराष्ट्रात ४५+ जागा निवडून येतील असा भाजपला विश्वास होता. मात्र एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात महायुतीला अपयश येत असताना दिसत होतं. निकालादिवशी एक्झिट पोलपेक्षाही जागा महाविकास आघाडीने मिळवल्या होत्या. जवळपास ३० जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आणि महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्या. त्यात भाजपचा केवळ ९ जागांवर विजय झाला आहे. त्यामुळे भाजपमध्ये कमालीची अस्वस्थत: आहे.

देवेंद्र फडणवीस यांनीही या अपयशाची जबाबदारी स्वीकारत जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती. मात्र भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी ते नाकारत कारणं शोधा आणि तयारीला लागण्याच्या सूचना केल्या होता. आता काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तिथेही महाविकास आघाडीला यश मिळेलं असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे भाजपने मेगाप्लान तयार केला आहे. राज्यातील ४८ मतदारसंघांमध्ये निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. निरीक्षक या मतदारसंघातील जनतेची मतं जाणून घेणार आहेत, त्यात मराठा समाजचं प्राबल्य असलेल्या मतदारसंघाचीही समावेश आहे. याचा अहवाल तयार करून वरिष्ठाना पाठवण्यात येणार असून त्यादृष्टीने विधानेसभा निवडणुकांचं काम केलं जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री होऊ नये - रामदास आठवले

Madhur Bhandarkar: 'सुपरस्टारची पत्नी होणे सोपे नाही....' ; पाहा मधुर भांडारकरचा आगामी चित्रपट

New Marathi Movie: सोनाली कुलकर्णी आणि स्वप्निल जोशीची केमेस्ट्री; "सुशीला - सुजित" मध्ये नेमकं काय असणार?

IPL 2025: Vaibhav Suryavanshi खरंच १३ वर्षांचा आहे का? जवळच्या व्यक्तीने केला मोठा खुलासा

Viral Video: मुंबईत रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीवर हिंदी बोलण्याची सक्ती, कर्मचाऱ्याची प्रवाशावर दादागिरी; VIDEO

SCROLL FOR NEXT