MAHARASHTRA POLITICS: ₹20 CRORE OFFER CLAIM TO CONGRESS MLA SPARKS FRESH DEFECTION ROW 
महाराष्ट्र

काँग्रेसच्या आमदाराला 20 कोटींची ऑफर? फोडाफोडीचं राजकारण थांबणार कधी?

Operation Tiger Row: संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एका काँग्रेस आमदाराला पक्षांतरासाठी 20 कोटी रुपयांची कथित ऑफर देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Girish Nikam

शिंदे सेनेच्या ऑपरेशन टायगरमुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालंय. अशातच खासदार राऊतांनी आणखी एक मोठं विधान केलंय. मविआच्या आमदाराला शिंदेसेनेची 20 कोटींची ऑफर आल्याचा दावा केलाय. विरोधी पक्षातील कोणत्या आमदाराला ऑफर आली आहे ? या आमदाराने काय प्रतिक्रीया दिली आहे? पाहूया एक रिपोर्ट.

ठाकरे सेनेचे सहा खासदार फुटल्याचा धक्का ताजा असताना आमदार सचिन अहिरांनी ठाकरेंची साथ सोडल्याने राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. एकीकडे शिंदेसेनेचं राज्यातील राजकीय वजन वाढलेलं असताना विरोधकांनीही फोडाफोडीच्या राजकारणाची धास्ती घेतली आहे. अशा स्थितीतच खासदार संजय राऊत यांनी एक मोठा दावा केला आहे.

महाविकास आघाडीचे आमदार धीरज लिंगाडे यांना शिंदेसेनेकडून 20 कोटींची ऑफर आल्याचं म्हटलंय. लिंगाडे हे विधान परिषदेत अमरावती पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांनी राऊतांचा दावा फेटाळून लावला आहे.

मविआचा आमदार शिंदेंच्या संपर्कात?

राऊतांच्या या दाव्यावर सत्ताधाऱ्यांनी टिका केली आहे. राऊत मनात येईल ते आकडे सांगतात, असं म्हणत भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी टोला लगावला आहे. विधान परीषद निवडणुकीत मविआला एकही जागा जिंकता आली नाही. काँग्रेसच्या काही उमेदवारांनी तर ऐनवेळी माघार घेऊन पक्षाला तोंडघशी पाडलंय. याच पार्श्वभूमिवर बोलावलेल्या मविआच्या बैठकीला २३ आमदार गैरहजर होते.

एकीकडे फोडाफोडीच्या राजकारणाला उत आलेला असताना महाविकास आघाडीची एकी दिसत नाही. हे वास्तव आहे. उद्धव ठाकरेंनीही तिन्ही पक्षांच्या एकीची गरज व्यक्त केली आहे. भविष्यात ऑपरेशन टायगरमधून कोणावर नेम साधला जाणार ? विरोधी पक्षाचे आमदार पक्षाशी एकनिष्ठ राहणार का की सत्तेच्या वळचणीला जाणार? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lose Belly Fat : दैनंदिन जीवनातील 'या' चुका टाळा; पोटाची चरबी झटपट होईल कमी अन् कंबर दिसेल स्लिम

शिवाजी पार्कात तरुणाईचा महासागर! विजयी सभेत राज ठाकरेंनी जिंकली मनं; मनसे प्रमुखांनी नेमकं काय केलं?

Maharashtra News Live Update: युवाशक्तीपुढे केंद्र सरकारला झुकावेच लागले

Famous Actress : सिगारेटचा चटका दिला, वाटेल तिथे स्पर्श केला; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

IDA Hike: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १ जुलैपासून महागाई भत्ता वाढला, जाणून घ्या किती वाढणार पगार

SCROLL FOR NEXT