राजकीय वर्तुळात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे युत्या, आघाड्यांच्या बातम्या समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना महायुतीत सहभागी होण्याची ऑफर असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे राजू शेट्टी महायुतीत जाणार की महाविकास आघाडीचा हात धरणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. अशातच आता राजू शेट्टी यांनी आगामी लोकसभा निवडणुकांबाबत सर्वात मोठे विधान करत स्वाभिमानीची भूमिका स्पष्ट केली आहे.
काय म्हणालेत राजू शेट्टी?
"आता आघाडी-युतीचा अनुभव आला आहे. सत्ता गेली आली कि शेतकऱ्यांची आठवण येते आणि सत्ता आली की शेतकऱ्यांचा विसर पडतोय हा यापूर्वीचा अनुभव घेतलाय. त्यामुळे आता आगामी लोकसभा निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढवण्यासाठी तयारी झाल्याचे," राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी स्पष्ट केले आहे. तसेच लवकरच आमची भुमिका घेऊन थेट मैदानात उतरणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.
यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी मराठा आंदोलनावरुनही (Maratha Aarkshan) राज्य सरकारचे कान टोचले. "मराठा आरक्षणाला विधीमंडळाचा पाठिंबा असतानाही मराठा समाजाला सरकारने वेठीस धरले. त्यामुळे मराठ्यांचे वादळ निघाले आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच अजुनही वेळ गेली नाही कुणावरही अन्याय न होता निर्णय घ्यावा," असा सल्लाही राजू शेट्टी यांनी दिला.
दरम्यान, स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या अटकेवरुनही राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. शेतकरी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून होत आहे. शेतकरी आत्महत्येत 2.5 टक्क्यांनी वाढ झाली त्यामुळे एकप्रकारे व्यवस्थेचे हात शेतकऱ्यांच्या रक्ताने रंगलेत, अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.