ramdas kadam On Uddhav Thackeray Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचे खच्चीकरण केलं, रामदास कदम यांचा खळबळजनक आरोप

Ramdas Kadam On Uddhav Thackeray: आनंद दिघे यांचे खच्चीकरण उद्धव ठाकरे यांनी केला असल्याचा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Priya More

अमोल कलये, रत्नागिरी

दिवंगत शिवेसना नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूला २३ वर्षे पूर्ण झाले असताना देखील अजूनही त्यांच्या मृत्यूवरून राज्यात अनेकदा वातावरण तापताना दिसते. 'आनंद दिघे यांना मारण्यात आलं होतं, त्यांचा घातपात झाला होता. हे ठाणे जिल्ह्याला माहीत आहे.', असा गंभीर आरोप शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. नुकताच शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत.

रामदास कदम यांनी रत्नागिरीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना आनंद दिघे यांच्या मृत्यूविषयी अनेक गंभीर गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितले की, 'आनंद दिघे यांचा ठाणे जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांनी मागितला होता हे मला माहीत आहे. आनंद दिघे यांचे खच्चीकरण उद्धव ठाकरे करीत होते हे १०० टक्के सत्य आहे. आनंद दिघे यांच्या नावाचे राजकारण नको. आनंद दिघे मोठी व्यक्ती होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिघे देव मानत होते. बाळासाहेबांच्या वाढदिवसाला दिघेसाहेब बाळासाहेबांचे पाय धुण्याचे काम करीत होते.'

तसंच,'उद्धव ठाकरे यांनी अनेक मोठ्या होणाऱ्यांचे पंख कापले. त्यात माझ्या सकट दिघेसाहेब देखील होते. धर्मवीर यांचे काम मोठे होते. पण आशीर्वाद त्यासाठी बाळासाहेबांचे होते. उद्भव ठाकरे यांनी दिघे यांचे पंख कापण्याचे काम केले.', असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.

रामदास कदम यांनी पुढे सांगितले की, 'आनंद दिघे आणि मी दोघे जवळचे मित्र होतो. १९९५ ला सरकार आलं तेव्हा आनंद दिघे विकासाची कामे आणि यादी माझ्याकडे द्यायचे मी ती मंजूर करून आणायचो. माझ्या हस्ते भूमिपूजन ते घ्यायचे. आनंद दिघे शेवटच्या माणसापर्यंत पोहचावे यासाठी चित्रपटाच्या माध्यामातून एकनाथ शिंदे काम करत आहेत. त्यांचा खून कसा झाला? आणि कोणी केला याबाबत ही निवडणुकीच्या तोंडावरची वेळ नाही.'

'आनंद दिघे यांच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच त्यांच्या ठाणे जिल्हाप्रमुखाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांनी मागितला होता. यासंदर्भात स्वत: आनंद दिघे आणि माझी चर्चा झाली होती. खरं तर पक्षात आपल्यापेक्षा मोठं कुणी होऊ नये यासाठी उद्धव ठाकरेंनी खूप प्रयत्न केले. माझ्यासह अनेक नेत्यांचे पंखं त्यांनी कापली. त्यामुळे आनंद दिघे यांची पंख कापण्याचे कामही उद्धव ठाकरेंनी केलं की काय?, असा संशय माझ्या मनात आहे.', असेही रामदास कदम यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT