Sanjay Raut News Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Raut News : नितीन गडकरींना भाजपच्या पहिल्या यादीतून का डावललं? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

Sanjay Raut On BJP : त्यामुळे कोणी नितीन गडकरींचे नाव पुढे केले तर ते तेथे असू नयेत म्हणून गडकरींचा पत्ता आताच कट करण्याचं हे षडयंत्र आहे, असं संजय राऊत म्हणाले.

Ruchika Jadhav

Sanjay Raut On BJP :

Maharashtra Political News :

राज्यात लवकरच लोकसभा निवडणुका होणार आहेत. आगमी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने नुकतीच १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे. नितीन गडकरी यांना डावललं जातंय असं म्हणत यावर खासदार संजय राऊतांनी याची कारणेही सांगितली आहेत.

नितीन गडकरी हे एक परखड आणि स्पष्टवक्ते असलेले नेते आहे. ते छत्रपती शिवाजी महाराज यांना मानतात त्यामळे ते दिल्लीची गुलामी पत्करणार नाहीत असा त्यांचा स्वभाव आहे. नितीन गडकरी हे विकासाला महत्व देतात. फसवणुकीला ते महत्व देत नाहीत, असं संजय राऊत म्हणाले.

गडकरींचा पत्ता आताच कट करण्याचं षडयंत्र

आपल्या देशातील विकासामध्ये सर्वात मोठं योगदान नितीन गडकरी संभाळत असलेल्या मंत्रालयांचं आहे. गडकरी फसवणुकीला महत्व देत नाहीत. अशा व्यक्तीला दिल्लीत पुन्हा संधी मिळाली तर २०२४ मध्ये भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे कोणी नितीन गडकरींचे नाव पुढे केले तर ते तेथे असू नयेत म्हणून गडकरींचा पत्ता आताच कट करण्याचं हे षडयंत्र आहे, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना राऊतांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील निशाणा साधला. या देशातील जनता कोणत्या परिस्थितीत जगत आहे हे तुम्हाला माहिती आहे. तरी देखील तुमच्या परिवारात मणिपूर आणि कश्मीरी पंडित येत नाहीत का? असा सवाल राऊतांनी भाजपला विचारला आहे.

मोदींनी कश्मीरी पंडीतांच्या घरवापसीसाठी आश्वासने दिली. ते तुमच्या परिवारात येत नाहीत का? तुमचा परिवार हा फक्त लुटमार आणि पक्षफोडणाऱ्यांचा परिवार आहे. अशा पद्धतीने तुम्ही जनतेला फसवण्याचा प्रयत्न करत असाल, तर यावेळी जनता तुम्हाला चोख उत्त देईल, अशा शब्दांत राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Recharge Plan: जिओची नवी ऑफर! गेमिंग प्लॅनची सुरुवात फक्त ४८ रुपयांपासून; डेटा, कॉलिंग अन् दमदार ऑफर्स

Maharashtra Live News Update: धाराशिव जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर

Red Alert : पुढील ४८ तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे, तब्बल २२ जिल्ह्यांना रेड अलर्ट, शक्य असेल तर घरात राहा

Success Story: विदेशात शिक्षण, लाखो रूपयांची नोकरी सोडली अन् झाला IPS, अमित जैन यांचा प्रेरणादायी प्रवास

Kaam Trikon Yog: 18 वर्षांनी बनला काम त्रिकोण योग, 'या' 3 राशींना मिळणार भरपूर पैसा

SCROLL FOR NEXT