MNS Jagar Yatra Saam TV
महाराष्ट्र

MNS Jagar Yatra: मनसेच्या जागर यात्रेला सुरुवात; लांजा ते वेरळदरम्यान अमित ठाकरेंचा सहभाग

Amit Thackeray: कोकणात एकूण आठ टप्प्यात पदयात्रा निघणार असून प्रत्येक टप्प्यात १५ किलोमीटरची पदयात्रा असणार आहे.

Ruchika Jadhav

Maharashtra Political News:

मुंबई गोवा महामार्गासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोकण जागर यात्रेला आजपासून सुरूवात झाली आहे. महामार्गावर पळस्पे फाटा येथून अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेला सुरुवात झालीये. संपूर्ण कोकणात एकूण आठ टप्प्यात पदयात्रा निघणार असून प्रत्येक टप्प्यात १५ किलोमीटरची पदयात्रा असणार आहे. (Latest Marathi News)

विविध टप्प्यात शालिनी ठाकरे, बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, नितीन सरदेसाई, विनोद खोपकर, संदीप देशपांडे, वैभव खेडेकर हे पदयात्रेचे नेतृत्व करणार आहेत. संध्याकाळी 6 वाजता कोलाड नाका येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेने यात्रेची सांगता होईल.

मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे आज मनसे रस्त्यावर उतरली आहे. सकाळी ७ वाजल्यापासून कोकण जागर यात्रेला प्रारंभ करण्यात आलाय. कोलाड नाक्यावर या यात्रेची सांगता होणार आहे. त्यामुळे येथे रस्त्यांवर ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे.

रस्त्याच्या मुद्द्यावरुन काही दिवसांपूर्वी मनसेने मोठी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर आता जागर यात्रेतून मनसेने आंदोलन पुकारलं आहे. जागर यात्रेमध्ये मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते सहभागी झालेत. मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी आणि बॅनबाजी यात्रेत केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

ईश्वरपुरात बलात्कारी राक्षस, सामुहिक अत्याचारानंतर नग्न धिंड

SCROLL FOR NEXT