Chhagan Bhujbal Saam Tv
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal: 'मी कुठल्याही पक्षात जाणार नाही', ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचं वृत्त छगन भुजबळांनी फेटाळलं, काय म्हणाले बघा Video

Chhagan Bhujabal: महायुती सरकारमध्ये नाराज असलेले छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. छगन भुजबळ यांनी आज संजय राऊत आणि मिलिंग नार्वेकर यांची भेट घेतल्यानं ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

Bharat Jadhav

'मी कोणालाही भेटलो, मी कोणत्याच पक्षात जाणार नसल्याचं म्हणत छगन भुजबळ यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचे वृत्त फेटाळलंय. महायुतीमधील नाराजी नाट्यानंतर छगन भुजबळ हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. छगन भुजबळांनी मिलिंद नार्वेकर आणि संजय राऊत यांची भेट घेतली असून ते लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं वृत्त माध्यमात आलं होतं. त्यावर छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलंय.

मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभेचं तिकीट आणि नंतर राज्यसभेत मिळालेली हुलकाणीवरुन छगन भुजबळ हे नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. खासदारकीसाठी दिल्लीतून छगन भुजबळ यांचे नाव निश्चित करण्यात आलं होतं. तरीही त्यांच्याऐवजी शिंदे गटाचे नेते हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात होती. त्यावरून भुजबळ हे नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छगन भुजबळ यांनी आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली. महायुतीत नाराज असलेल्या छगन भुजबळ यांनी समता परिषदेची बैठक घेत दबावचं राजकारण सुरू केलं होतं. त्यावरून अंदाज बांधला जात आहे की, ते लवकरच ठाकरे गटात प्रवेश करतील असं म्हटलं जात आहे.

ठाकरे गटाच्या प्रवेशावर काय म्हणाले भुजबळ

मी कुठल्याच पक्षात जाणार नाही, मी कुणालाही भेटलो नाही. कोणाच्या गाठीभेटी घेतल्या नाहीत.विरोधी पक्षातील कोणत्यात नेत्याला आपण भेटलो नाही, असं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकरांच्या भेटीचे वृत्त फेटाळलं.साहाजिकच भेटीचं वृत्त फेटाळल्यानंतर ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या वृत्तावर पडदा पाडलाय.

आपण विरोधी पक्षातील कोणत्याच नेत्याला भेटलो नाही, हे अजित पवार यांना माहितीये.लोकसभा उमेदवारीवरुन नाराज असल्याचं वृत्तावर भुजबळ म्हणाले, मी नाराज होतो मान्य आहे, पण राजकारणात नेहमी नाराज होऊन चालत नाही, असं वृत्त फेटाळताना भुजबळ म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks: पावसाळ्यात कढीपत्ता आणि कोथिंबीर ताजेतवाने कसे ठेवाल? जाणून घ्या खास टिप्स

Maharashtra Live News Update : आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक

OLA-Uber: सरकारचा मोठा निर्णय! ओला, उबर कंपन्याना आता ८ वर्षांपर्यंतच टॅक्सी चालवता येणार

Kolhapur News: वडिलांच्या मोबाइलवर मुलगा खेळायचा फ्री फायर गेम, बँक खात्यातून ५ लाख गायब | VIDEO

श्रावणात ३ ग्रह करणार गोचर; 'या' राशी होणार मालामाल

SCROLL FOR NEXT