Maharashtra Cabinet Meeting  Saam TV
महाराष्ट्र

Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग; घटस्थापनेचा मुहूर्त ठरला?

Maharashtra Politics: विस्तारासाठी तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली आहे.

Ruchika Jadhav

Cabinet Expansion:

राज्य सरकारने नुकतीच विविध जिल्ह्यांतील पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर केली. त्यानंतर आता रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा होतेय. रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार नवरात्र उत्सवात होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीये. या मंत्रिमंडळ विस्ताराची गेल्या अनेक दिवसांपासून महायुती सरकारमधील नेते वाट पाहात आहेत. (Latest Marathi News)

महायुती सरकारमध्ये सध्या भाजपचे १० शिवसेना शिंदे गट १० आणि नव्याने आलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ९ मंत्री आहेत. त्यामुळे आता मंत्रिमंडळात आणखीन १४ मंत्र्यांचा समावेश होऊ शकतो. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर त्यात भाजपला ८ मंत्रीपदे हवी आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी प्रत्येकी ४ मंत्रिपदे मिळावीत यासाठी आग्रही आहेत.

राज्यात मंत्रिमंडळ विस्तार गणेशोत्सव काळात होणार अशी चर्चा होती. मात्र तेव्हा यासाठी मुहूर्त लागला नाही. त्यानंतर आता १५ किंवा १६ ऑक्टोबर किंवा नवरात्र उत्सवादरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. विस्तारासाठी तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली आहे.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत श्रेष्ठींची भेट घेतल्यावर तेथूनही हिरवा कंदिल दाखवण्यात आलाय. मंत्रिमंडळ विस्तारानंतर कोणत्या पक्षाला किती खाती मिळणार आणि कोणाला मंत्रीपद मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT