Narendra Modi, Rahul Gandhi News Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'है तयार हम अभियान कशासाठी?' भाजपचे पाच खोचक सवाल; काँग्रेसवर हल्लाबोल

Gangappa Pujari

मयुर राणे, मुंबई|ता. २८ डिसेंबर २०२३

Maharashtra Politics:

राष्ट्रीय कॉंग्रेसचा आज १३८ वा वर्धापनदिन. पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आज कॉंग्रेसकडून नागपूरमध्ये है तैय्यार हम ही महारॅली आयोजित करण्यात आली आहे. बहादुरा येथील ‘भारत जोडो मैदाना’वर होणाऱ्या या यात्रेमध्ये कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी खासदार राहुल गांधी, प्रियांका गांधी यांची उपस्थिती असणार आहे. कॉंग्रेसच्या या कार्यक्रमावरुन भारतीय जनता पक्षाने हे अभियान नेमकं कशासाठी? म्हणत जोरदार टीका केली आहे.

भाजपचे पाच सवाल, कॉंग्रेसवर हल्लाबोल...

१) हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनला साथ देण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का?

२) स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का?

३) काँग्रेसचे (Congress) खासदार धीरज साहू यांच्याकडे सापडलेली साडे तीनशे कोटींची रोकड अवैध मार्गानं कशी मिळवावी हे सांगण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का?

४) मोहब्बत की दुकानच्या नावानं द्वेष पसरविण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का?

५) घराणेशाही कशी वाचवायची हे सांगण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का?

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, या रॅलीसाठी महाराष्ट्र कॉंग्रेसचे नेते नागपूरमध्ये तळ ठोकून आहेत. या रॅलीसाठी कराडमधून पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली 600 हून जास्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते बसेसमधून नागपुरमध्ये दाखल झाले आहेत. या रॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन करत कॉंग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणूकांचे रणशिंग फुंकले जाण्याचीही शक्यता आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sri Lanka Tourism : श्रीलंकेत मनसोक्त आणि कमी खर्चात फिरता येणार; कसं वाचा संपूर्ण डिटेल्स

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT