Sharad Pawar Speech Saam TV
महाराष्ट्र

Sharad Pawar Speech: त्यांना माहितीये आपलं नाणं चालणार नाही; फोटोवरुन शरद पवारांचा अजित पवार गटाला टोला

Ruchika Jadhav

Sharad Pawar Speech News:अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ उडाला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आता वेगळं लढण्याचा निर्णय घेतलाय. राष्ट्रवादीचे दोन वेगळे गट झाले असले तरी देखील अजित पवारांच्या अनेक बॅनरवर शरद पवारांचे फोटो पाहायला मिळत आहेत. त्यावरुन शरद पवारांनी अजित पवार समर्थकांवर निशाणा साधलाय. (Latest Marathi News)

काही लोक म्हणतात ते आमचे गुरू आहेत. आज मुंबईत सभेआधी पोस्टर आणि काही बॅनर पाहिले. त्यावर माझे फोटो लावण्यात आले होते. अजूनही त्यांना माझा फोटो लागतो. कारण त्यांना माहीत आहे आपले नाणे चालणार नाही. त्यांचं नाणं वाजत नाही म्हणून ते माझा फोटो वापरतात, असा टोला शरद पवारांनी आजित पवारांना लगावला.

आज वाय.बी. चव्हाण सेंटरवर राष्ट्रवादीची सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शरद पवारांनी अजित पवारांनी घातलेल्या भावनीक सादेवर प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्या पांडुरंगाने आम्हाला आशिर्वाद द्यावा, असं शरद पवरांना उद्देशून अजित पवार म्हणाले होते. यावर अजित पवारांना प्रत्युत्तर देताना शरद म्हणाले की, पांडुरंग दर्शनाला कोणी थांबवू शकत नाही.

उपस्थितांना संबोधित करताना शरद पवारांनी पंतप्रधानांवर देखील निशाणा साधला. मोदी एकदा बारामतीला आले होते. त्यावेळी देश कसा चालवायचा हे मला पवार साहेबांनी शिकवलं असं मोदी म्हणाले होते, असा किस्सा शरद पवारांंनी यावेळी सांगितला. आता भाजपने राष्ट्रवादीवर भ्राष्टाचाराचे आरोप लावले आणि नंतर त्याच नेत्यांचा पाठींबा स्विकारला, अशा शब्दांत शरद पवरांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचं अधिकृत युट्यूब चॅनेल हॅक !

How To Book IRCTC Tatkal Ticket: रेल्वेचं तात्काळ तिकीट कसं बुक करायचं? वाचा ही संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

SCROLL FOR NEXT