Sharad Pawar Photo In Ajit Pawar Cabin  Saamtv
महाराष्ट्र

Ajit Pawar News: राष्ट्रवादीत दोन गट पडले, पण 'साहेब' एकच! अजित पवारांच्या मंत्रालयातील केबिनमधील शरद पवारांच्या फोटोची चर्चा

पक्षाच्या (NCP) मालकीचा वाद सुरू असतानाही अजित पवार यांच्या दालनात शरद पवार यांचा फोटो लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

Gangappa Pujari

Maharashtra NCP Crisis: अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली. अजित पवार यांच्यासह ४० आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

या बंडखोरीनंतर शिवसेने प्रमाणेच अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट राष्ट्रवादीमध्येही पडल्याचे चित्र दिसत आहे. मात्र या बंडखोरी नंतरही अजित पवार यांच्या मंत्रालयाच्या दालनातील शरद पवार यांच्या फोटोने लक्ष वेधले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यातील खाते वाटपाचा तिढा अखेर आज सुटला असून अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह त्यांच्यासोबत शपथविधी घेतलेल्या ९ मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्याच्या वित्त आणि नियोजन विभागाच्या मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

पदभार स्विकारल्यानंतर सध्या अजित पवार यांच्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या दालनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये लावलेल्या शरद पवार (Sharad Pawar) यांच्या फोटोने सर्वांचेच लक्ष वेधले.

शरद पवार यांनी फोटो न वापरण्याचा दिला होता आदेश?

दरम्यान, अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांनी त्यांचे फोटो न वापरण्याचे आदेश अजित पवार गटाला दिले होते. परंतु अजित पवार यांनी मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांना शरद पवार यांचे फोटो वापरण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यामुळे पक्षाच्या (NCP) मालकीचा वाद सुरू असतानाही अजित पवार यांच्या दालनात शरद पवार यांचा फोटो लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daya Dongre Passes Away: मराठी सिनेसृष्टीचा तारा निखळला; 'खाष्ट सासू' काळाच्या पडद्याआड, मनोरंजन विश्वावर शोककळा

वेट लॉससाठी दिवसभरात किती चपात्या खाव्या? डिनरमध्ये चपातीसोबत खा 'हा' पदार्थ, कारण..

Diabetes Diet: साखरेवर नियंत्रण ठेवायचंय? तर डायबिटीजच्या रुग्णांसाठी अमृत असणारं हे हिरवे पान खा

गर्लफ्रेंडचं लग्न झालं, 24x7 लक्ष ठेवण्यासाठी बॉयफ्रेंडनं झुडुपात कॅमेरा बसवला, पतीनं पाहताच.. नेमकं घडलं काय?

सांगलीमध्ये पुन्हा राजकारण तापलं; जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यात पॉलिटिकल वाॅर, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT